Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, २१ जुलै, २०१९

डॉ जितेंद्र ठाकूर प्रतिष्ठान तर्फे 2 कुटुंबांना प्रत्येकी 25000/- रू. धनादेश




शिरपूर:प्रतिनिधी(सुभाषभोई)डॉ.जितेंद्र ठाकूर यांनी पूर्ण शिरपूर तालुक्यातील 2 लाख 75 हजार लोकांचा अपघाती विमा काढला आहे. या नुसार समर्यापाडा येथील सत्तारसिंग पावरा यांचे अपघाती निधन झाल्याने त्यांच्या पत्नीला 25000/- रु. चा धनादेश, आणि अजंदे खु. येथील डॉ जगदीश जाधव यांचे अपघाती निधन 



झाल्याने त्यांच्या कुटुंबाला 25000/-रु. चा धनादेश डॉ. जितेंद्र ठाकूर प्रतिष्ठान चे अध्यक्ष मा. डॉ जितेंद्र ठाकूर, केव्हीपीएस संस्थेचे अध्यक्ष मा. तुषार रंधे, भाजपा तालुकाध्यक्ष राहुल रंधे, नगरसेवक रोहित रंधे,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद पाटिल,शशांक रंधे, चंद्रकांत भाऊसाहेब, यांच्या हस्ते देण्यात आला.




डॉ जितेंद्र ठाकूर प्रतिष्ठान तर्फे अजून 30 कुटुंबांना प्रत्येकी 25000रु. प्रमाणे 7.50 लक्ष रु चे धनादेश मंजुरी नंतर देण्यात येणार आहेत.

यावेळी धनादेश देतांना खामखेड्याचे सामाजिक कार्यकर्ते विजय पाटील, वाडी चे उपसरपंच जीतूभाऊ पाटील, , आनंदा भाऊसाहेब,प्रा.प्रदीप पाटील, देवेंद्र राजपुत, विनोद पटेल, छगन पवार, अत्तरसिंग पावरा, अजंदे खु. चे जगदीश पाटील व आशिष पाटील गावातील भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध