Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, २१ जुलै, २०१९

संजय गांधी,श्रावणबाल,ईंदीरा गांधी योजनांची प्रकरणे मंजूर करुन लाभार्थ्यांना लाभ द्यावा,


महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी प्रदेश उपाध्यक्ष शामकांत ईशी यांचे निवेदन
 



शिरपूर - प्रतिनिधी : (विनायक कोळी)  शासनाच्या विविध योजनांची 1500 प्रकरणे शिरपूर तहसील कार्यालयात प्रलंबित असून ही सर्व प्रकरणे लवकरात लवकर मंजूर करावेत व लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काच्या लाभ मिळवून द्यावा अशा आशयाचे निवेदन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या ओबीसी विभागामार्फत प्रदेश उपाध्यक्ष शामकांत ईशी यांच्या  नेतृत्वाखाली  देण्यात आले

शिरपूर तहसील कार्यालयात संजय गांधी निराधार विधवा व अपंग योजना, श्रावणबाळ वृद्धापकाळ योजना, इंदिरा गांधी निराधार विधवा, वृद्धापकाळ व अपंग योजना अशा अनेक शासकीय योजनांची डिसेंबर 2018 पासून ते आज पावेतो सुमारे 1500 प्रकरणे गरजू लोकांनी ऑनलाईन पद्धतीने दाखल केले आहेत. ही सर्व प्रकरणे प्रलंबित असमन मंजूर झालेली नाहीत. ही सर्व प्रकरणे लवकरात लवकर मंजूर 

करावेत व संबंधित विधवा, वृद्ध, अपंग, निराधार या लाभार्थ्यांना न्याय द्यावा अशा आशयाचे निवेदन आज दि. 20 जुलै रोजी दुपारी 4 वाजता शिरपूर तहसील कार्यालयात नायब तहसीलदार सुदाम चौरे यांना देण्यात आले.

पुढील आठवड्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर होऊन आचारसंहिता लागण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे लाभार्थ्यांची ही विविध योजनांची प्रकरणे मंजूर होणार नाहीत व त्या निवडणुका संपताच पुन्हा विधानसभेच्या निवडणुका लागणार आहेत. त्यामुळे गोरगरीब, निराधार जनता व महिला, अपंग व्यक्ती या योजनेच्या 

लाभापासून वंचित राहतील. तरी तहसील कार्यालयाने सुमारे 1500 प्रकरणे तातडीने मंजूर करून गोरगरीब लाभार्थ्यांना लाभ द्यावा. गेल्या आठ महिन्यांपासून हे सर्व वृद्ध, अपंग, निराधार नागरिक व महिला हैराण होत आहेत. ही सर्व प्रकरणे मंजूर करण्याबाबतचे निवेदन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे ओबीसी विभागाच्या वतीने देण्यात आले.

यावेळी निवेदन देतांना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे ओबीसी विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष शामकांत ईशी, एनएसयुआय जिल्हाध्यक्ष संदीप माळी, अल्पसंख्यांक काँग्रेस सेलचे जिल्हाध्यक्ष इरफान मिर्झा, नगरसेवक देवेंद्र राजपूत, बाजार समिती माजी सभापती नारायणसिंग चौधरी, माजी पं. स. सदस्य छगन गुजर, शि. मं. सदस्य राजेंद्र पाटील, सिद्दिक तेली, नगरसेवक चंद्रकांत सोनवणे, सेवादल तालुकाध्यक्ष विनायक कोळी, एनएसयुआय जिल्हा सचिव प्रतिक चौधरी, एनएसयुआय 

तालुकाध्यक्ष स्वप्निल मराठे, प्रकाश चौधरी, राहुल माळी, रफिक तेली, मयूर ईशी, दिनेश चौधरी, पंडित पाटील, जाकिर बागवान, संजय पाटील, आशिष चौधरी, महेश चौधरी, राजेंद्र चौधरी, दुर्गेश चौधरी, चेतन चौधरी, मुकेश सोनवणे, गणेश देशमुख, गोपाल चिंतामण, महेश चौधरी, गणेश चौधरी, प्रतिक साळुंखे, संजय साळुंखे, मोहम्मद इस्माईल, पवन मराठे, संदिप कोळी, योगेश पवार, रमेश महाले, गोकुळ कुंभार आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध