Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, २० जुलै, २०१९

पुण्याचे नगरसेवक श्री.रविंद्र धंगेकर यांच्याकडुन 'खैरवे ता.शहादा जि.नंदुरबार प्राथमिक शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप....!



 
शाहदा (प्रतिनिधी )जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,खैरवे ता.शहादा जि.नंदुरबार येथे पुणे येथील नगरसेवक श्री.रविंद्र धंगेकर यांच्या हिंदमाता प्रतिष्ठान व युवकमित्र परिवाराचे प्रवीण महाजन यांच्या सहकार्याने 25 स्कुल बॅग,50 

वह्याचे  शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून बामखेडा विद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य पी.सी.पटेल सर,केंद्रप्रमुख प्रकाश माळी,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री राजेंद्र गिरासे, खैरवेचे सरपंच श्री प्रवीण निकुंभे, पोलीस पाटील श्री धनराज 



पानपाटील,कोंढावळ येथील सामाजिक कार्यकर्ते निखिल माळी,गणेश माळी,शाळेचे मुख्याधापक रतिलाल आखाडे सहशिक्षक प्रेमसिंग गिरासे,चंद्रशेखर नागराज वाडीले यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर शाळेतील अत्यंत गरीब व गरजू अशा 60 विद्यार्थ्यांना वह्या व स्कुल बॅग यांचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.सदर साहित्य मिळवून देणकामी पुणे येथील युवकमित्र परिवाराचे प्रवीण महाजन यांचे सहकार्य लाभले.कार्यक्रमात 

मुख्याध्यापक रतिलाल आखाडे यांनी शाळेची यशोगाथा सांगितली. त्यानंतर श्री पी. सी. पटेल सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना सांगितले की, सर्व विद्यार्थ्यांनी अभ्यास केला पाहिजे कारण तुमच्यात  कोण काय बनेल.? याचं भविष्य तुमच्या हातात आहे. शुद्धलेखन विषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. गरिबीतून शिक्षण कसे घ्यावे या विषयी जाणीव विध्यार्थ्यांना करून दिली. त्यानंतर 

केंद्रप्रमुख श्री माळी यांनी शालेय गुणवत्ता विषयी मार्गदर्शन केले. स्वतः चे अनुभव कथन केले. त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्ते निखिल माळी यांनी सुद्धा 

विध्यार्थ्यांना प्रेरणा देणारे अनुभव सांगितले. सूत्रसंचालन श्री चंद्रशेखर नागराज वाडीले सर यांनी केले.  तर आभार मुख्याध्यापक रतिलाल पांडू आखाडे सर यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध