Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, २२ जुलै, २०१९
चाळीसगाव येथे आदिवासी पारधी महासंघाचा भव्य महामेळावा संपन्न
अमळनेर :प्रतिनिधी (शिवाजी पारधी)
चाळीसगाव येथील आदिवासी पारधी महासंघच्या वतीने भव्य आदिवासी महामेळावा संपन्न झाला
या मेळाव्याचे आयोजन विनोद साळूखे व शत्रुघ्न नेतकर यांनी केले होते , सदर मेळावा हा आदिवासींच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी आयोजित करण्यात आला होता यात ५ वी अनुसूची, आदिवासीची स्वायत्तता, पेसा कायदा, आदिवासीची राजकिय ,सामाजिक ,व आर्थिक
परिस्थितीच्या अधोगतीला कारणीभूत असलेल्या घटकांवर उपाय व जनजागृती करण्यात आली , यासह भाडवलंदार व सरकारने विकासाच्या नावाखाली हस्तगत केलेल्या आदिवासीच्या जमिनीचा योग्य मोबदला न मिळाल्याने त्या जमिनी त्वरित परत कराव्यात इत्यादी मागण्यांसाठी हा
भव्य मेळावा आयोजित करण्यात आला होता , या मेळाव्यास हजारोंच्या संख्येने आदिवासी बांधव उपस्थिती होते. सदर मेळावा राजपुत मंगल कार्यालय, लक्ष्मीनगर चाळीसगाव येथे करण्यात आला होता , तत्पूर्वी शहरातून रॅलीचे आयोजन रेल्वे स्टेशन ते राजपुत मंगलकार्यालय येथे काडण्यात आली , या रॅलीत आदिवासी बांधवांनी आपल्या पारंपारिक वेशभूषेत रँली काडण्यात आली तसेच कार्यक्रमाचे उदघाटक आदिवासी पारधी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष श्री आप्पासाहेब साळुंके हे होते तसेज
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी बहुजन क्रांती मोर्चाचे मुकेश नेतकर व प्रमुख पाहुणे म्हणुन श्री रा, ना, सोनवणे महासंघ महासचिव आणि गुजरात राज्यातील लाभलेले आदिवासी पारधी महासंघाचे महिला अधिकारी या होत्या ,
आदिवासी, एससी, एसटी बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी झाले , सगळे राज्य व जिल्हातील माऩ्यवर पदधिकारीचे सत्कार करण्यात आले, या कार्यक्रमाला समाज बांधवानी मोठ्या प्रमाणात प्रतीसाथ दिला,
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेरात संशयास्पद गोळीबारात तरुणाचा मृत्यू; पोलिस तपास सुरू अमळनेर (प्रतिनिधी) – शहरातील शाह आलम नगर परिसरात एका तरुणाचा गोळी लागून मृत्यू ...
-
शिरपूर (प्रतिनिधी) राज्य उत्पादन शुल्क विभागाने शिरपूर तालुक्यात मोठी कारवाई करत अवैध मद्यसाठ्यावर घाव घातला आहे. देवदत्त नेहळे, निरीक्षक र...




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा