105 रुग्णांची तपासणी, २० रुग्ण शस्त्रक्रियेसाठी जळगावला रवाना.
रावेर (प्रतिनिधी)(अजीज शेख )भवरलाल. आणि कांताबाई जैन फौडेशन जळगाव यांचे तफै मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबीर आज दि. १० नोंव्हेबर बुधवार रोजी संपन्न झाले.या शिबारात १०५ रुग्णांची
तपासणी करण्यात आली.तर २० जणांना जंळगाव येथे मोतीबिदू शस्त्रक्रियेसाठी रवाना करण्यात आले. तसेच डोळे तपासून चष्म्यांचे नंबर मोफत देण्यात आले याचाही बऱ्याच गरजुनी लाभ घेतला .
येथील छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, कृषी उत्पन्न बाजार समिती , रावेर येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती डी .सी. पाटील होते
यावेळी उद्योगपती अनिलशेठ अग्रवाल, नगरसेवक अॅड . सुरज चौधरी, माजी नगसेवक अॅड योगेश गजरे, माजी सभापती डॉ . सुभाष पाटील, संचालक योगेश पाटील,सचिव गोपाळ महाजन, रावेर साप्ताहिकाचे संपादक सुनील चौधरी पत्रकार समशेर खान उपस्थितीत होते . प्रास्तविका कांताई नेत्रालय मोतीबिंदू विभागप्रमूख युवराज देर्साडा यानी तर सुत्रसंचालन पत्रकार राजेंद्र अटकाळे यांनी केले
या शिबीरात एकुण १०५ रुगणांची तपासणी करण्यात आल्यानंतर २० रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी जळगांव येथे पाठविण्यात आले. आहे.
या शिबीरात चिकित्सक वैभव चौधरी व देवराज मिश्रा कांताई नेत्रालय जळगांव यांनी तपासणी केली. या वेळी तालुक्यातील व परिसरातील गरजु रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला'
शिबीर यशस्वितेसाठी खान्देश माळी महासंघ तालुकाध्यक्ष पिंटू महाजन, सहका-यांनी सह कार्य केले .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा