शिरपुर:(प्रतिनिधी)( सुभाष भोई ) देशात पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी, राज्यात मुख्यमंत्री मा.ना.श्री. देवेंद्रजी फडणवीस यांचा नेतृत्वावर विश्वास ठेवुन जनता भाजपाच्या पाठीशी खंबीरपणे उभी असुन शिरपुर तालुक्यात पक्ष वाढीसाठी सर्वांनी सामाहिक प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे धुळे भाजपा जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी
यांनी सांगितले. ते १० जुलै रोजी शिरपुर येथील भाजपा कार्यालयात नवमतदार नोंदणी व सदस्य नोंदणी अभियानाच्या शहर बैठकीत बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी पुढे म्हाणाले कि केंद्र व राज्य सरकारमध्ये मोठ्या प्रमाणात विविध विकासकामे, मुलभुत व अत्यावश्यक सुविधा होत आहेत.
राष्टीयध्यक्ष तथा केंद्रीय गृहमंत्री मा. ना. श्री. अमितजी शाहा व प्रदेशध्यक्ष तथा केंद्रीय राज्यमंत्री मा. ना.दादासो श्री. रावसाहेब दानवे यांचा मार्गदर्शनात पक्ष भक्कम होत असुन सध्या तरुण पिढी भाजपा सोबत मोठ्या संख्येने जोडले जात आहेत. त्यामुळे पक्षाला चांगलाच लाभ होत आहे. नंदुरबार लोकसभा मतदार संघात भाजपाला शिरपुर तालुक्यातुन मोठे मताधिक्य मिळाले असुन येणार्या विधानसभा निवडणुकीत सुध्दा
लोकसभाप्रमाणेच शिरपुर मतदार संघात भाजपा उमेदवाराला मताधिक्य मिळणार असा आत्मविश्वास जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांनी व्यक्त केला. शिवाय दि.१२ जुलै पासुन बाळदे येथुन तालुका प्रभारी डाॅ. जितेंद्र ठाकुर
हे संवाद यात्रा काढणार असुन हि संवाद यात्रा तालुक्याभर जावुन जनतेशी संवाद साधणार आहे. या यात्रेत
पदाधिकारी, कार्यकर्तेंनी सहभागी व्हावे असेही आवाहान केले. याप्रसंगी जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी, जिल्हा चिटणीस संजय आसापुरे, जिल्हा कोषाध्यक्ष आबा धाकड, तालुका प्रभारी डाॅ. जितेंद्र ठाकुर, शहराध्यक्ष हेमंत पाटील, वैद्यकिय आघाडी जिल्हाध्यक्ष डाॅ. मनोज निकम, नपा विरोधी पक्षनेता राजेंद्रसिंग गिरासे, विधानसभा विस्तारक अर्जुन महाले, तालुका
सरचिटणीस देवेंद्र देशमुख, शहर सरचिटणीस महेंद्र पाटील, रोहित शेटे, शहर उपाध्यक्ष नरेश पवार, प्रशांत चौधरी, राहुल देवरे, मुकेश पाटील, शहर चिटणीस अविनाश शिंपी, रहिम खाटीक, राधेश्याम भोई, अल्पसंख्याक मोर्चा जिल्हा सरचिटणीस मुबीन शेख, शहराध्यक्ष अरमान मिस्तरी, युवा मोर्चा जिल्हा
उपाध्यक्ष हेमराज राजपुत, शहराध्यक्ष विक्की चौधरी, शहर उपाध्यक्ष गणेश भावसार, ओबीसी मोर्चा शहराध्यक्ष रविंद्र सोनार, भटक्या विमुक्त आघाडी शहराध्यक्ष रविंद्र भोई, भटु माळी, सुभाष भोई,
हिरालाल कोळी, अनु. जाती मोर्चा जिल्हा सरचिटणीस दिपक पाटोळे आदि उपस्थित होते. तालुका प्रभारी डाॅ. जितेंद्र ठाकुर, शहराध्यक्ष हेमंत पाटील यांनी हि विचार व्यक्त केलेत. सुत्रसंचनल व आभार जिल्हा चिटणीस संजय आसापुरे यांनी मानलेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा