Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, १९ जुलै, २०१९

निंभोरा ता:रावेर चे मुळ रहीवासी जनसंग्राम चे विवेक ठाकरे यांचे मुबंईत उपोषण




पूर्ववत आरक्षणासाठी धोबी समाजाचे मुंबईत आमरण उपोषण सुरू निंभोरा रावेर(प्रतिनिधी)अजीज शेख  दि.-१९

महाराष्ट्रातील धोबी समाजाला १९५७ पूर्वी असल्याप्रमाणे व देशात १७ राज्ये व ५ केंद्रशासित प्रदेशात असलेल्या अनुसूचित जातीचे (एस.सी.) आरक्षण पूर्ववत लागू व्हावे म्हणून समाजाच्या ३० वर्षांपासूनच्या लढाईकडे व रास्त मागणीकडे प्रत्येक 

सत्तेतील सरकारने वारंवार तर दुर्लक्ष केलेच मात्र विद्यमान भाजपा सरकारने सुद्धा गेल्या साडेचार वर्षात समाजाला निव्वळ आश्वासने दिल्याने राज्यातील धोबी समाजात राज्यसरकार विरोधी प्रचंड नाराजी असल्याने धोबी समाजाचे प्रदेशाध्यक्ष विवेक ठाकरे यांच्या नेतृत्वात पदाधिकाऱ्यांनी

समाजाच्या वतीने आज १९ जुलैपासून मुंबई येथे आझाद मैदानावर बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्यात आले.

राज्यात भाजपा सरकार सत्तेवर आल्यावर फडवणीस सरकारकडून सुद्धा भ्रमनिराशा झाल्याने राज्यभरातील समाजात प्रचंड खदखद व रोष आहे.

धोबी समाजाला अनुसूचित जातीच्या सवलती लागू व्हाव्यात म्हनिंभोरा ता:रावेर चे मुळ रहीवासी जनसंग्राम चे विवेक ठाकरे यांचे मुबंईत उपोषणणून डॉ.दशरथ भांडे समितीचा अहवाल केंद्राला पाठवण्यात यावा ही समाजाची मुख्य मागणी मान्य व्हावी यासाठी धोबी समाजाचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष विवेक ठाकरे यांच्यासह समाजबांधवांनी १९ जुलै पासून प्राणांतिक उपोषण पुकारले आहे.

समाजाच्या मागण्या-
1)धोबी समाजाचे पुनर्विलोकन समितीचा डॉ.दशरथ भांडे समितीचा २००२ मध्ये सामाजिक न्याय विभागाकडे सादर करण्यात आलेला अहवाल शिफारशींसह केंद्राला पाठविण्यात यावा.

2) संत गाडगेबाबा आर्थिक विकास महामंडळ स्थापन करून महमंडळाला १ हजार कोटींचा निधी उपलब्ध करून धोबी समाजातील सुशक्षित बेरोजगारांना कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत अल्पव्याजदराने कर्ज देणे.

3)महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी समाजातील किमान १ हजार मुलांना वस्तीगृहाची व्यवस्था करून मिळावी.

4) केंद्राची अनुसूचित जातीच्या सवलत मिळेपर्यंत महाराष्ट्रातील धोबी जातीला विशेष प्रवर्गात समाविष्ठ करून शिक्षण व नोकरीमध्ये स्वतंत्र 5 टक्के आरक्षण लागू व्हावे.

5) श्री संत गाडगेबाबा कार्यभूमी स्मारक समिती 
ऋणमोचन (जि.अमरावती) या पंजिकृत संस्थेला गाडगेबाबांचे राष्ट्रीय स्मारकाचे कामासाठी शासनाकडे प्रस्तावित असलेल्या मंजूर आराखड्याला निधी द्यावा.

6)गाडगेबाबा स्वछता अभियान अभियान प्रभावीपणे राबविण्यात यावे.

7) राष्ट्रसंत गाडगेबाबांनी अक्षरशून्य असूनही महाराष्ट्रात शैक्षणिक क्रांती घडवून आणली त्यामुळे त्यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर व्हावा.

8)धोबी समाजाच्या प्रतिनिधीस राज्याच्या विधानसभेवर राज्यपाल कोठ्यातून समाविष्ट करावे.

आंदोलना दरम्यान दररोज  समाज संघटनेच्या विविध फ्रंटलचे १ हजार लोक साखळी उपोषण करून आंदोलनाला पाठिंबा देतील,असे नियोजन असून समाजाची आरक्षणाची प्रलंबित मागणी पदरात पाडल्याशिवाय उपोषण न सोडण्याचा संकल्प राज्य पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

चौकट --
समाजबांधवांचा सहभाग-
आंदोलनाची सुरुवात झाल्यावर 
२० रोजी-नांदेड विभाग व राज्यातील लॉड्री व्यावसायिक,
२१ रोजी-औरंगाबाद विभाग व राज्यातील धोबी समाजाचे शासकीय-निमशासकीय अधिकारी आणि कर्मचारी,
२२ रोजी-पुणे विभाग व मुंबई धोबी घाट तसेच कोकण विभाग,
२३ रोजी-धोबी समाजाच्या सर्व भाषिक महिला,

२४ रोजी-नाशिक विभाग व बारा बलुतेदार समाजाचे राज्य पदाधिकारी तसेच महाराष्ट्र डेबूजी फोर्स व २५ रोजी अमरावती विभाग आणि धोबी समाजाचे सुशिक्षित बेरोजगार साखळी उपोषणात सहभागी होणार आहेत.

राज्यभरातील धोबी समाजाच्या बंधु-भगिनी यांनी आमरण उपोषणाला पाठिंबा व शासनाला जाब विचारण्यासाठी दैनंदिन नियोजनाप्रमाणे साखळी उपोषणासाठी मुंबई येथे आझाद मैदानावर उपस्थित राहावे असे आवाहन समाजाचे महासचिव संजय भिलकर,कार्याध्यक्ष गणेश 

जगताप,विभागीय अध्यक्ष पंडीतबापू जगदाळे,युवा प्रदेशाध्यक्ष संजय वाल्हे,महिला प्रदेशाध्यक्ष प्रतिभा गवळी, महाराष्ट्र डेबूजी फोर्सचे प्रदेशाध्यक्ष कैलास तेलंग आदींनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध