Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, २३ जुलै, २०१९
कृषिदुतांनी घेतला कृषी उत्पन्न बाजार समितीचा आढावा
पुणे :प्रतिनिधी (निखिल राजपूत )
नारायणगाव, ता. जुन्नर दि 23जुलाई 2019
गुंजाळवाडी परीसरात कृषी महविद्यालय , पुणे येथील कृषीदूतांतर्फे विविध कार्यक्रम तसेच विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे , तसेच गुंजाळवाडी परिसरातील प्रमुख पिक टमाटे असल्यामुळे त्याविषयी त्याच्या विक्री , तसेच बाजारभाव , विपणन याविषयी माहिती मिळवण्यासाठी कृषी
उत्पन्न बाजार समिती , जुन्नर ची उपबाजार समिती, नारायणगाव येथे भेट देऊन तेथील व्यापारी , शेतकरी ,कामगार सर्वांशी चर्चा केली , तसेच यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती, नारायनगाव चे सभापती संजय
काळे , तसेच विविध पदाधिकारी उपस्थित होते , त्यांनी कृषीदूतांना मोलाचे मार्गदर्शन केले , व मार्केट बाजारातील विविध समस्या ,भविष्यातील नियोजन याविषयी मार्गदर्शन केले, तसेंच कृषिदूतांनी विद्यापीठाच्या विविध उपक्रमांची माहीती दिली , तसेच यावेळी कार्यक्रम अधिकारी डॉ.
एम.एन.वाघमारे सर , कृषी महविद्यालय , पुणे 05 यांचे मार्गदर्शनाखाली कृषिदूत सौरव पाटील , शुभम पोफळे , निखिल राजपूत , राजेश राऊत , बद्रीनाथ साबळे , महेश शिंदे (कृषि महाविद्यालय, शिवाजीनगर, पुणे) यांनी या क्षेत्रभेटीत सहभाग घेतला यापुढेही कृषिदुत गूंजाळवाडी परीसरात विविध उपक्रम राबवणार आहेत.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेरात संशयास्पद गोळीबारात तरुणाचा मृत्यू; पोलिस तपास सुरू अमळनेर (प्रतिनिधी) – शहरातील शाह आलम नगर परिसरात एका तरुणाचा गोळी लागून मृत्यू ...
-
शिरपूर (प्रतिनिधी) राज्य उत्पादन शुल्क विभागाने शिरपूर तालुक्यात मोठी कारवाई करत अवैध मद्यसाठ्यावर घाव घातला आहे. देवदत्त नेहळे, निरीक्षक र...



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा