Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, २३ जुलै, २०१९

अहमदपुर येथे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसा निमित्त वृक्षारोपण.




प्रतिनिधी:(गजानंन आनतवाळ) अहमदपुर.दि.22 महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा विधीमंडळ गटनेते अजित दादा पवार यांच्या वाढदिवसा निमित्त अहमदपर मध्ये वृक्षारोपण करण्यात आले. 
अहमदपूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शहरातील कमलानेहरू विद्यालयात अजित पवार यांच्या वाढदिवसा निमित्त विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले तद नंतर शाळेच्या प्रांगणात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष माजी आमदार बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण करून अजित पवार यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. 

सदरील वाढदिवसाच्या कार्यक्रमास माजी आमदार बाबासाहेब पाटील यांच्या सह राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष शिवानंद हेंगणे , माजी सभापती अॅड. टी.एन.कांबळे , राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस गोविंदराव गिरी ,जिल्हा परिषद सदस्य माधवराव जाधव ,महेश बँकेचे उपाध्यक्ष निवृतीराव कांबळे ,जिल्हा 

सरचिटणीस गोपीनाथ जोंधळे,तालुका सरचिटणीस सतीश नवटके ,अनिस खुरेसी तानाजी राजे ,विठ्ठल मुळे ,सुनील डावरे ,प्रकाश फुलारी ,बालाजी पाटील बोळेगावकर , विलास नागरगोजे ,मुख्यध्यापक मदणे ,एन.डी. राठोड यांच्या सह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध