Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, १९ जुलै, २०१९

अमळनेरात बनावट दारूचा कारखाना उध्वस्त तब्बल चार लाखांचा मुद्देमाल जप्त





अमळनेर:प्रतिनिधी (शिवाजी पारधी) अमळनेर  धुळे रस्त्यावरील रेणुका टाईल्स च्या मागील
बनावट देशी विदेशी दारू तयार करण्याचा कारखाना पोलिसांनी उध्वस्त केला असून 



दोन वाहनासह सुमारे सव्वा चार लाखाचा माल ताब्यात घेण्यात आला
असून धुळ्याच्या एक आरोपी व अमळनेरच्या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमळनेर हुन धुळे जाणाच्या रस्त्याच्या कडेला वीज मंडळ कार्यालयाच्या समोर
रेणुका स्टाईल च्या मागे पत्र्याच्या शेड मध्ये रसायन टाकून बनावट देशी विदेशी
दारू तयार केली जात असल्याची गोपनीय बातमी पोलीस निरीक्षक अंबादास मोरे याना मिळाल्यावरून त्यांनी सपोनि प्रकाश सदगीर , आर जी माळी ,पोलीस उप निरीक्षक गणेश सूर्यवंशी ,

पोलीस उपनिरीक्षक राहुल लबडे, मिलिंद भामरे, सुनील पाटील , किशोर पाटील ,
शरद पाटील , ईश्वर सोनवणे , भटूसिंग तोमर, सुनील हटकर , मधुकर पाटील
यांचे पथक तयार करून दुपारी साडे तीन वाजेच्या सुमारास पत्र्याच्या शेड मध्ये
छापा टाकला असता हितेश चंदूलाल बजाज वय २६ रा साक्री रोड धुळे हा दारू भरत असताना आढळून आला.

त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने हा कारखाना दिनेश भावसार , किरण
रमेश ढवळे रा आर के नगर धुळे रोड ८२५ रुपयांचं माल जप्त करण्यात आला व तिघा आरोपींविरुद्ध भादवी ३२८, ३४ सह दारूबंदी कायद कलम ६५ ई नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे तपासपी एस आय राहुल लबडे करीत आहेत.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध