Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, १९ जुलै, २०१९

वैजापूर आदिवासी आश्रम शाळेच्या विद्यार्थिनींना बाधा : पाच विद्यार्थिनी उपजिल्हा रुग्णालयात दाखल



वैजापूर :ता.चोपडा प्रतिनिधी( दीलीप पाटील )आश्रम  शाळेतील पाच विद्यार्थिनींची  तब्येत बिघडली असून त्यांना उलट्यांचा त्रास होत आहे.त्यामुळे विद्यार्थिनींना उपजिल्हा रुग्णालयात 

उपचारा साठी दाखल करण्यात आल्याच्या घटनेने खडबळ उडाली आहे.याबाबत आश्रमशाळेचे मुख्याध्यापक व यावल येथील आदिवासी प्रकल्प अधिकारी यांचेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु संपर्क होऊ शकला नाही.पाच पैकी दोन विद्यार्थिनींना घरी पाठविले आहे.तर तीन विद्यार्थिनींवर उपचार सुरू आहेत.

वैजापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले तिथे वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसल्यामुळे  रुग्णवाहिका बोलवून संध्याकाळी सात वाजता चोपडा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

वैजापूर आश्रम शाळेच्या वसतिगृह अधीक्षक दोन दिवसापासून शासकीय कामा निमित्त यावल प्रकल्प कार्यालयात गेल्या असल्याने बाधा झालेल्या विद्यार्थिनींना शाळेतील शिक्षक व कर्मचाऱ्यांनी रुग्णालयात दाखल केले. 

दूषित पाण्यामुळे बाधा झाल्याची चर्चा सुरू आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध