Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, २३ जुलै, २०१९

शिरपूर येथील आमदारांचे गाव सुळेतील महिलेने डॉ जितेंद्र ठाकूर यांच्या समोर ग्रामपंचायतीने गावातील गोरगरीब जनतेवर केलेल्या हुकूमशाहीचा भांडाफोड केला.डॉ जितेंद्र ठाकूर यांनी तात्काळ गटविकास





शिरपूर:-(प्रतिनिधी) शिरपूर येथील आमदारांचे गाव सुळेतील महिलेने डॉ जितेंद्र ठाकूर यांच्या समोर ग्रामपंचायतीने गावातील गोरगरीब जनतेवर केलेल्या हुकूमशाहीचा भांडाफोड केला.डॉ जितेंद्र ठाकूर यांनी तात्काळ गटविकास 

अधिकारी,मुख्य कार्यकारी अधिकारी धुळे यांना फोन वर संबंधित समस्यांचे निराकरण करण्याची विनंती केली.व गावकऱ्यांसह ग्रामपंचायतवर मोर्चा वळवला.



संवाद यात्रे दरम्यान भाजपाचे डॉ जितेंद्र ठाकूर हे शिरपूर तालुक्याचे आमदार यांच्या गावात आले होते.मात्र तेथील गोरगरीब जनतेने अनेक समस्यांचा पाढा डॉ जितेंद्र ठाकूर यांच्या समोर मांडण्यात आला.
गावात गोरगरीब लोकांचे घरकुल होऊ दिले जात नाही त्यांचे फाँर्म भरू देत नाहीत.गावात उज्वला गँसचे फाँर्म भरायला आले तर ते पण गँसचे फाँर्म भरू दिले जात नाही.यावेळी समस्या सांगतांंना येथील महिला हेमलता गोवर्धन सिंधी वय ६० 

आपल्या समस्या सांगतांना आश्रु अणावर झाले.त्या व्रुध्द महिला म्हणाली की, येथे ग्रामपंचायत एक प्रकारे हुकूमशाही करते,पाच हजार देऊन देखील नळ कनेक्शन दिले नाही, जे नळ कनेक्शन होते ते सुळे ग्रामपंचायतीने बंद केले.याबाबत ग्रामपंचायत येथे ग्रामसेवकाला सांगायला गेले तर वारंवार ग्रामपंचायत बाहेर 

हाकलण्यात आले.कुठलीही गोष्ट ऐकण्यात येत नाही.पन्नास वर्षाच्या वर राहुन देखील घरकुल दिले गेले नाही ,हेतुपूर्वक महिलेच्या घरामागे लोकांंना शौचालयास बसवले जाते.येथील काही महिलांनी अनेक समस्या सांगितल्या यावेळी सरपंच यांना डॉ जितेंद्र ठाकूर यांनी आमदार साहेबांच्या गावातील जनतेचे होणारे हाल व त्यांचे प्रश्न मार्गी लावावे.घरकुल, शौचालय, रस्ता गावातील वाढलेले घाणीचे साम्राज्य आदी गोष्टींवर लक्ष देऊन तात्काळ प्रश्न सोडवावे अशा एक ना अनेक सुचना सरपंच यांना 

सांगितल्या व सुळे गावातील चालणारा संपूर्ण प्रकार मुख्य कार्यकारी अधिकारी व गटविकास अधिकारी यांना फोन वर सांगितला.आमदारांच्या गावातील समस्या व प्रश्न जर सुटत नसतील तालुक्यातील गोरगरीब जनतेचे काय हाल होत असतील जितेंद्र ठाकूर असे यावेळी सुळे येथील सरपंच यांना सांगण्यात आले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध