शिरपूर : (प्रतिनिधी) ट्रॅक मधील मालाची स्वतःच्या फायद्यासाठी दुसऱ्या राज्यात परस्पर विल्हेवाट करून फरार झालेल्या परराज्यातील चालक व क्लिनर यांना मुद्देमालासहित ताब्यात घेतले
कर्नाटक राज्यातून सुपारी माल घेऊन दिल्लीला जात असताना ट्रॅकचे चालक व क्लिनर यांनी त्या मालाची स्वतःच्या फायद्यासाठी 38 लाख 64 हजार रुपये किमतीच्या 70 किलो वजनाच्या सुपारीच्या 300 गोण्यांची परस्पर विल्हेवाट करून ट्रॅक क्र एचआर 46 सी 4453 ही गाडी हाडाखेड गावाजवळ उभा करून पसार झाले होते.याप्रकरणी 13 जुलै रोजी सांगवी तालुका पोलीस ठाण्यात चालक जोगेंदरसिंह
रोशनसिंह रा कबूलपूर आग्रा उत्तरप्रदेश व सतपाल बलवानसिंग रा टिटोली ता.जि. रोहतक हरियाणा याच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला होता.सदर गुन्हा नोंद झाल्यानंतर पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे व अप्पर पोलीस अधीक्षक डॉ.राजू भुजबळ यांच्या परवानगीने व मार्गदर्शनाखाली पीएसआय दीपक वारे त्यांनी पथक तयार करून हरयाणा राज्यात संशयितांच्या शोधार्थ पाठविले.पथकाने दोन दिवस तपास करून हरियाणा मधून सतपाल यास ताब्यात घेऊन शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात आणले व अटक केली. अटक केल्यानंतर पोलीस रिमांड मध्ये घेतले असता गुन्हा कबूल केला व त्याच्या माहितीवरून तालुका पोलिसांनी छत्तीसगड
राज्यातील बेमेतरा येथून पूर्ण मुद्देमाल हस्तगत करून मुद्देमाल तालुका पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला आहे.ही कार्यवाही ठाणे प्रभारी दीपक वारे,पीएसआय योगेश ढिकले,हवालदार संजय देवरे,पवन गवळी यांच्या पथकाने केली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा