प्रतिनिधी :(विशाल डुकरे )तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग येथे दिनांक 30.06.2019 रोजी पोलीस अधीक्षक, उस्मानाबाद, श्री आर.राजा, यांच्या मार्गदर्शनाखाली दहशतवाद विरोधी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक श्री नाईकवाडे हे पथकासह नळदुर्ग येथे
पेट्रोलिंग करत असताना त्यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, हैद्राबादकडुन नळदुर्गकडे येणाऱ्या कार क्र. एम.एच. 04 जी.ई. 302 यामध्ये दोन इसम गांजाची अवैध वाहतुक करीत आहेत. मिळालेल्या माहितीच्या आधारे मा.श्री आर.राजा पोलीस अधीक्षक, उस्मानाबाद यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक
30.06.2019 रोजी 19.40 वा.सु. हैद्राबाद ते नळदुर्ग रोडवर, आलियाबाद पुल, येथे पथकाने नाकाबंदी करुन निस्सान कंपनीची सनी कार क्र. एम.एच. 04 जी.ई. 302 ची तपासणी केली असता सदर कारमध्ये
आयुब याकुब मुल्ला वय 28 वर्षे रा. यशवंत नगर खोपोली ता.खालापुर जि.रायगड,
शारुक दस्तगीर कुरेशी वय 23 वर्षे रा. पटेल नगर खोपोली ता.खालापुर जि. रायगड
हे दोघे खाकी रंगाच्या 130 पॅकेटमधुन एकुण 292.8 कि.ग्रॅ. वजानाचा गांजा (किंमत अंदाजे 4,38,000/-रु.) अवैध वाहतुक करताना मिळुन आले. त्यावरुन त्यांच्या विरुध्द नळदुर्ग पोलीस ठाणे येथे एन.डी.पी.एस. कायदयाचे कलम 20 (ब) प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा