Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, २० जुलै, २०१९

शेगाव रेल्वे स्टेशन स्वच्छ ठेवण्यामध्ये प्रवासी संघटनेचा मोलाचा सहभाग- मोहन देशपांडे




शेगाव :प्रतिनिधी( उमेश राजगुरे )
प्रवासी संघटना रेल्वे विभाग तसेच जय मातादी ग्रुप तर्फे स्वच्छता अभियान
शेगाव:- श्री संत गजानन महाराज यांच्या पदस्पर्शाने कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शेगाव येथील रेल्वेस्थानक 




परिसर स्वच्छ ठेवण्यात प्रवासी संघटनेचा मोलाचा सहभाग असल्याचे प्रतिपादन शेगाव रेल्वे स्टेशनचे परिवहन निरीक्षक मोहन देशपांडे यांनी केले.

शेगाव येथील प्रवासी संघटना जय मातादी ग्रुप व रेल्वे विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शेगाव रेल्वे स्थानकावर स्वच्छता अभियान राबविण्यात आले त्याप्रसंगी मोहन देशपांडे बोलत होते. या कार्यक्रमाला उपस्थित रेल्वे स्टेशन प्रबंधक पीएम पुंडकर यांनी 



मार्गदर्शन करताना म्हटले की शेगाव रेल्वे स्टेशन हे आदर्श रेल्वे स्टेशन म्हणून संपूर्ण भारतभर ओळखले जावे याकरिता रेल्वे प्रशासन प्रवासी संघटना व जय मातादी ग्रुप यासारख्या सामाजिक संघटनांना सोबत घेऊन कार्य करीत राहणार रेल्वे प्रवाशांमध्ये स्वच्छतेविषयी जनजागृती निर्माण 

करण्यासाठी रेल्वे प्रवासी संघटना व जय मातादी ग्रुप यासारख्या सामाजिक संघटना प्रशंसनीय कार्य करीत आहे. या कार्यक्रमाला रेल्वे विभागातर्फे स्टेशन प्रबंधक पीएम पुंडकर परिवहन निरीक्षक एम के देशपांडे मुख्य वाणिज्य निरीक्षक एम बी निकम मुख्य तिकीट डी टी बडगुजर भुसावळ येथील वाणिज्य निरीक्षक राकेश कुमार वरिष्ठ खंड अभियंता विद्युत व 

सामान्य एम एम शेख स्वास्थ निरीक्षक अनिल कुमार गुप्ता प्रवासी संघटनेचे अध्यक्ष शेखर भाऊ नागपल शेगाव संघर्ष समितीचे पत्रकार विजय कुमार मिश्रा पत्रकार राजकुमार व्यास पत्रकार संजय त्रिवेदी पत्रकार ललित देवपुजारी भोई समाज शेगांव शहराध्यक्ष ,पत्रकार २४ 

तरुण गर्जना उमेश राजगुरे.. अशोक रूपचंद भुतडा सुनील देशमुख मयूर मुना वरुण नागपाल सचिन अग्रवाल रितेश नेरकर घनश्याम शर्मा महाराज यांच्यासह रेल्वे विभागातील सफाई कर्मचारी व प्रवासी संघटनेचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध