Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, १८ जुलै, २०१९

चाळीसगावात पारधी महासंघा तर्फे भव्य आदिवासी महामेळावा चे आयोजन




अमळनेर प्रतिनिधी,(गणेश चव्हाण) 
चाळीसगाव येथील आदिवासी पारधी महासंघच्या वतीने भव्य आदिवासी महामेळावाचे 

आयोजन करण्यात आले आहे.
 या मेळाव्याच आयोजक तथा स्थानिक कार्यकर्ते विनोद साळूखे व शत्रुघ्न नेतकर यांनी मेळाव्या बाबत माहिती देतांना सांगितले की, सदर मेळावा हा आदिवासींच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी आयोजित केला आहे, यात ५ वी अनुसूची, आदिवासीची स्वायत्तता, पेसा कायदा, आदिवासीची राजकिय ,सामाजिक  ,व आर्थिक परिस्थितीच्या अधोगतीला 

कारणीभूत असलेल्या घटकांवर उपाय व जनजागृती करण्यात येईल, यासह भाडवलंदार व सरकारने विकासाच्या नावाखाली हस्तगत केलेल्या आदिवासीच्या जमिनीचा योग्य मोबदला न मिळाल्याने त्या जमिनी त्वरित परत कराव्यात इत्यादी 

मागण्यांसाठी हा भव्य मेळावा आयोजित केला आहे, आशा करतो की या मेळाव्यास हजारोंच्या संख्येने आदिवासी बांधव उपस्थिती देतील. सदर मेळावा  दि.२१ जुलै २०१९ रविवार रोजी  सकाळी.१० वाजता  
 ठिकाण राजपुत मंगल कार्यालय, 

लक्ष्मीनगर चाळीसगाव येथे असणार आहे, तत्पूर्वी शहरातून रॅलीचे आयोजन केलेले आहे, सदर रॅली रेल्वे स्टेशन ते राजपुत मंगलकार्यालय येथे काडण्यात येईल , या रॅलीत आदिवासी बांधवांनी आपल्या पारंपारिक वेशभूषेत येण्याचे आव्हान त्यांनी केले, तसेच कार्यक्रमाचे उदघाटक 

आदिवासी पारधी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष श्री आप्पासाहेब साळुंके हे असणार असून
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी  बहुजन क्रांती मोर्चाचे मुकेश नेतकर व प्रमुख पाहुणे म्हणुन श्री रा, ना, सोनवणे महासंघ महासचिव हे आहेत,

तरी सर्व आदिवासी, एससी, एसटी बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आव्हाहन विनोद साळुंके शत्रुघ्न नेतकर यांनी केले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध