Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, १८ जुलै, २०१९
संवाद यात्रेदरम्यान बोराडी स्टेट बँकेची समस्या,बँकेबाहेर राडा
शिरपूर :-प्रतिनिधी: डॉ जितेंद्र ठाकूर यांच्या आयोजनाखाली भाजप संवाद यात्रा दरम्यान बोराडी येथे स्टेट बँक आँफ इंडीया बँकेचे समस्या जाणून घेण्यासाठी तेथे गेले असता.बँकचे सुरक्षारक्षकाने उध्दट भाषा वापरल्याने डॉ जितेंद्र ठाकूर व राहुल रंधे यांच्यासह ग्रामस्थ आक्रमक झाले होते यामुळे स्टेट बँके बाहेर राडा निर्माण झाला होता.
जनसामान्यांचे समस्या जाणून घेण्यासाठी संवाद यात्रा शिरपूर तालुक्यातील बोराडी येथे आज दि १८ आले होते.त्यांच्या सोबत भाजपाचे तालुकाध्यक्ष राहुल रंधे यांच्यासह विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी अनेक ग्रामस्थांनी बोराडी येथील स्टेट बँकचे अधिकारी उध्दटपणे व जाणीव पुर्वक दुर्लक्ष करत जनतेला वेठीस ठेवत असतात अशी समस्या सांगून स्टेट बँकेची कैफियत सांगण्यात आली.या
समस्यांची कैफियत जाणून घेतल्या नंतर डॉ जितेंद्र ठाकूर यांच्यासह राहुल रंधे व जमलेले ग्रामस्थ थेट स्टेट बँक आँफ ईंडीया बँकेत पोहचले.मात्र बँकेचे वरिष्ठ अधिकारी रजेवर असल्याचे यावेळी सर्वांना सांगण्यात आले.याबाबत कँशिअर यांच्याशी डॉ ठाकूर, राहुल रंधे यांच्या सह ग्रामस्थांनी समस्यांंचा पाढा वाचत जनतेला वेठीस धरू नका अशी समज देत शाखा अधिकारी यांच्याशी उद्या पुन्हा येऊन भेटू असे सांगितले. सर्व
सामान्य जनतेचा व डॉ ठाकूर व राहुल रंधे यांचा रोष शांत होत नाही तितक्यात बँकेचे सुरक्षा कर्मचारी यांच्या उध्दटपणे बोलल्याने बँके बाहेर एकच गर्दी जमली
होती.अधिकारी आणी आम्ही बोलत असता सुरक्षा कर्मचारीचे उध्दटपणाने वागण्याचे काय कारण बर ?जनतेला राग येईल असे बोल्याने राडा निर्माण झाला होता.मात्र संबंधित अधिकारी नसल्याने पुन्हा उद्या किंवा परवा येऊन भेटू असे सांगत संवाद यात्रा पुढे सरकली.व पुढील गावात जाण्यास मार्गस्थ झाले होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
दिंडोरी (प्रतिनिधी) माधव खाबिया :- दिंडोरी तालुक्यातील पालखेड बंधारा येथे आज बुधवार दि.३१ एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास येथील शेतकरी ...
-
अमळनेरात संशयास्पद गोळीबारात तरुणाचा मृत्यू; पोलिस तपास सुरू अमळनेर (प्रतिनिधी) – शहरातील शाह आलम नगर परिसरात एका तरुणाचा गोळी लागून मृत्यू ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा