Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, १९ जुलै, २०१९

नदीजोड प्रकल्पांतर्गत माळण नदी प्रवाहीत करण्याबाबत जलसंपदा मंत्र्यांना निवेदन


प्रतिनिधी :अमळनेर  (शिवाजी पारधी)
तालुक्यातील नदीजोड प्रकल्पांतर्गत माळण नदी प्रवाहीत करण्याबाबत राष्ट्रवादीच्या जिल्हा परिषद सदस्या जयश्री अनिल पाटील यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना शुक्रवारी डीपीडिसी च्या बैठकीत निवेदन दिले.

तालुक्यातील पांझरा ते माळण नदीजोडचे सर्वेक्षण झाले आहे. या प्रकल्पांतर्गत माळण नदी प्रवाहीत करण्यासाठी सर्वेक्षण करुन अहवाल शासनाकडे सादर झाला आहे. तसेच त्याचा डी.पी.आर. देखील झाला आहे.

अमळनेर तालुक्यातील पश्चिम भागातील टंचाईग्रस्त गावेच लाभ क्षेत्रापासून वंचीत आहेत.

गेल्या वर्षापासून अनेक गावांमध्ये पाणी टंचाई आहे. पाणी नसल्याने गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचे टैंकर सुरु आहेत. माळण नदीला प्रवाहीत करण्यासाठी पावसाळ्यात पांझरेचे पाणी सोडावे. 

पावसाळ्यात पांझरा नदीतील वाहून जाणारे पाणी निसर्डी धरण, पिंपळे पाझर तलाव भरण्यासाठी विविध केटीवेअर पांझरा नदीत कमी खर्चाने टाकले जाऊ शकतात. यासाठी अनेक वर्षांपासून विविध स्तरावर प्रयत्न सुरु आहेत. मात्र शासन स्तरावर हालाचाली नसल्याने पश्चिम भागातील शेतकरी 

पाण्यापासून वंचीत राहत आहेत. नदीजोड प्रकलपांतर्गत माळण नदी प्रवाहीत करण्याच्या बंद असलेल्या हालचालींना लवकरात लवकर चालना देवून माळण नदी प्रवाहीत करण्यासाठी नदीजोड प्रकल्पांतर्गत योजना तात्काळ

कार्यान्वीत करावी. तसेच लोटाबाडगी पाझर तलाव रणाईचे ता. अमळनेर व सबगव्हाण ता. अमळनेर येथील
पाझर तलावाच्या प्रलंबित असलेली कामांना लवकरात लवकर गती द्यावी अशी मागणी जयश्री पाटील यांनी यावेळी निवेदनातून केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध