शिरपूर - प्रतिनिधी : लोकनियुक्त पहिल्या महिला नगराध्यक्षा सौ. जयश्रीबेन पटेल यांच्या संकल्पनेतून शिरपूर वरवाडे नगर परिषदेतर्फे फक्त महिलांसाठी बगीच्याचे (इव्हज पार्क) लोकार्पण गुरुवारी दि. 4 जुलै रोजी सकाळी 10.30 वाजता बन्सीलाल नगर येथे करण्यात येत आहे. महाराष्ट्र
राज्यातील अभिनव अशा या नाविन्यपूर्ण उपक्रम कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन नगराध्यक्षा सौ. जयश्रीबेन पटेल, मुख्याधिकारी अमोल बागुल यांनी केले आहे.
शिरपूर शहरातील वॉर्ड नंबर 2 मध्ये बन्सीलाल नगर येथे लोकनियुक्त नगराध्यक्ष जयश्रीबेन पटेल यांच्या संकल्पनेतून महिलावर्गासाठी अतिशय उत्कृष्ट असे यु पार्क हा नावीन्यपूर्ण बगीचा उपलब्ध करून देण्यात आला आहे.
शिरपूर शहरात श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यान, मुकेशभाई पटेल रिक्रिएशन गार्डन, अमुजमेंट पार्क, नानानानी पार्क यानंतर आता इव्हज पार्क हे खास महिलांसाठी चे उद्यान शिरपूरकर यांच्या सेवेसाठी खुले करण्यात आले आहे.
ममया इव्हज पार्क महिलांसाठी बनविण्यात आलेल्या गार्डन साठी धुळे व नंदुरबार जिल्ह्याचे विधानपरिषदेचे आमदार अमरिशभाई पटेल यांच्या आमदार निधीतून 15 लक्ष रुपये खर्च करण्यात आले आहेत. यातून संरक्षक भिंत व इतर बाबींसाठी खर्च
करण्यात आला आहे. नगरपालिकेच्या फंड मधून 5 लक्ष रुपये खर्च, यातून ओपन जीम साहित्ये व इतर बाबी साठी खर्च केला आहे. एकूण 20 लक्ष रुपये यासाठी खर्च
करण्यात आले आहेत. अतिशय महत्त्वाची बाब म्हणजे एस. व्ही. के. एम. संस्था एन. एम. आय. एम. एस. मार्फत अनमोल सहकार्य करण्यात आले आहे. त्यांच्या
ममार्फत विविध फुलझाडे, शोभेची महागडी रोपे व इतर खर्चिक बाबींसाठी योगदान देण्यात आले आहे. 25 हजार स्क्वे. फूट जागेवर हा इव्हज पार्क उभारण्यात आला आहे.
महिलांसाठी इव्हज पार्क मध्ये गुजरात येथून महागडी रोपे, खास बैठक व्यवस्था करण्यात आली असून येथे जॉगिंग ट्रॅक, लॉन्स, योगासाठी खास सोय, चर्चासत्र व विविध कार्यक्रम साठी व्यवस्था, चांगली लाईट व्यवस्था, शौचालय इत्यादी उपलब्ध केले आहे.
महिलांसाठी गार्डन सकाळी 5 ते 9 व सायंकाळी 5 ते 9 वाजेपर्यंत खुले राहिल. नाममात्र 2 रुपये प्रवेश शुल्क राहील तसेच वार्षिक पास उपलब्ध राहणार आहे. येथे नेहमी सिक्युरिटी व गार्डनर राहतील.
शिरपूर वरवाडे नगर परिषदेतर्फे फक्त महिलांसाठी बगीच्याचे (इव्ह पार्क) लोकार्पण गुरुवारी दि. 4 जुलै रोजी सकाळी 10.30 वाजता करण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्यातील अभिनव अशा या नाविन्यपूर्ण उपक्रम कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन नगराध्यक्षा सौ. जयश्रीबेन पटेल, मुख्याधिकारी अमोल बागुल यांनी केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा