Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, २२ जुलै, २०१९
भारतीय जन सम्राट पार्टीर्ची महिला मोर्चा कार्यकारणी जाहीर
भारतीय जन सम्राट पार्टीर्ची मलकापुर शहर महिला मोर्चा कार्यकारणी जाहीर
अध्यक्षपदी सौ.रेखा शर्मा तर सचिवपदी सौ.गीता दाभाडकर यांची निवड
मलकापुर (प्रतिनिधी) भारतीय जन सम्राट पार्टीच्या महिला मोर्चा मलकापुर शहर अध्यक्ष पदी रेखा राधेश्याम शर्मा यांची तर सचिव पदी सौ.गीता काशीनाथ दाभाडकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे ही नियुक्ती पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष
अजय टप तसेच महिला मोर्चा प्रदेश अध्यक्ष सौ.उवलाताई वाघवले यांच्या शिफारसी नुसार महिला मोर्चा तालुका अध्यक्ष सौ.आशा गजानन पारस्कर यांनी केली आहे.मलकापुर शहर अध्यक्ष सौ.रेखा राधेश्याम शर्मा यांनी आपली शहर
कार्यकारणी घोषीत केली असुन उपाध्यक्ष पदी सौ.शारदा हरी कोळी कोषाध्यक्ष पदी सौ.भाग्यश्री विनोद सपकाळ,सहसचिव सौ.नंदा वासुदेव वानखेडे,यांची तर सदस्य पदी सौ.संगीता अशोक टप,सौ.अश्विनी उमेश मोरे,सौ.शोभा कृष्णा
भोकरे.सौ.निर्मला प्रकाश पाटील,सौ.प्रतिभा भागवतसिंह पवार,सौ.विमल राजकुमार पिंजरकर,सौ.शारदा संतोष शिंदे,सौ.वैशाली विनायक भोंबे,सौ.सुनंदा रामदास रोठे यांची निवड करण्यात आली आहे
भारतीय जन सम्राट पार्टीची बुलडाणा जिल्हा निवडणुक आढावा बैठक संपन्न विधानसभा निवडणुकी करीता तयारीला लागा - भाऊसाहेब बावने
खामगाव (प्रतिनिधी) खामगाव येथे दि 21 रविवार रोजी भारतीय जन सम्राट पार्टीची बुलडाणा जिल्हा निवडणुक आढावा बैठक राष्ट्रीय अध्यक्ष भाऊसाहेब बावने यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली या वेळी जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघाचा आढावा घेण्यात आला तसेच येणार्या
विधानसभा निवडणुकी करीता पक्षाच्या पदाधिकारी यांनी आप आपल्या मतदार संघा करीता निवडणुकीच्या तयारीला लागा असे आवाहन पक्ष प्रमुख भाऊसाहेब बावने यांनी केले या बैठकीला राष्ट्रीय कोषाध्यक्ष कलीम पठाण हे हजर होते या वेळी नव नियुक्त पदाधिकारी तुळशिराम राखोंडे किसान आघाडी, किशोर तायडे युवा मोर्चा,ओंकार कुसुंबे भटके विमुक्त आघाडी या पदावर निवड झाल्या बद्दल मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला या बैठकीला जिल्ह्यातील विविध आघाड्या,मोर्चा,चे जिल्हा अध्यक्ष
पदाधिकारी तसेच पक्षाचे शहर व तालुका अध्यक्ष उपस्थित होते आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 विचारात घेऊन यांची मतदार नोंदणी झालेली नाही अशा वंचित राहिलेल्या नागरिकांना मतदार यादीत नाव नोंदणीसाठी जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. या विशेष मोहिमेचा नागरिकांनी लाभ घ्यावा. यांची नावे मतदार यादीत नाहीत त्यांनी ती नोंदविण्यासाठी
पुढाकार घ्यावा, असे आवाहन भारतीय जन सम्राट पार्टी चे बुलडाणा जिल्हा अध्यक्ष किशोर केळोदे यांनी केले आहे लवकरच मलकापुर येथे पक्षाचा महिला मेळावा व जिल्हा सभेचे आयोजन करणार असल्याचे मत पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष अजय टप यांनी व्यक्त केले आभार किशोर तायडे तर बैठकीचे सुत्र संचालन सचिन विटे यांनी केले
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी दिंडोरी तालुक्यातील वनारवाडी येथील डमाळे वस्ती येथे घरफोडी करून रोख रकमेसह सोन्याचे दागिने लांबवणार्या गुजरात र...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा