Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, २४ जुलै, २०१९
Home
/
Unlabelled
/
रावेर तालुक्यातील निंभोरा येथिल स्वामी विवेकानंद स्कूल मध्ये लोकमान्य टिळक जयंती साजरी. पर्यावर संवर्धन हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी जोपासनारच:- माजी सैनिक सुधाकर धनगर यांचे प्रतिपादन.
रावेर तालुक्यातील निंभोरा येथिल स्वामी विवेकानंद स्कूल मध्ये लोकमान्य टिळक जयंती साजरी. पर्यावर संवर्धन हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी जोपासनारच:- माजी सैनिक सुधाकर धनगर यांचे प्रतिपादन.
निंभोरा बुद्रुक ता.रावेर प्रतिनिधी (अजीज शेख ) येथिल स्वामी विवेकानंद इंग्लिश मेडीअम स्कुल मध्ये लोकमान्य टिळकांची जयंती साजरी करण्यात आली सर्वप्रथम प्रमुख पाहूणे म्हणून १९७१ सालातील भारत पाकीस्तान युध्दातील जख्मी माजी सैनिक सुधाकर धनगर यांच्या हस्ते लोकमान्य टिळकांच्या प्रतिमेचे पुजन करूण अभिवादन करण्यात त्यांनी बोलतांना सांगीतले की, लोकमान्य
टिळकांचे कार्य महान असून ते एक शूर स्वातंत्र सेनानी होते त्यांचे विचार अंगी कारण्याचे सांगत त्या काळी पारतंत्र्याचे संकट भारतावर होते म्हणून लोकमान्य टिळकांनी प्रतिज्ञा केली होती, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवनारच, अशी खंबीर प्रतिज्ञा घेऊन त्यांनी स्वातंत्र संग्रामात स्वतःहाला झोकून दिले. आजच्या काळात आपल्याला
पर्यावरणाचा होनारा ऱ्हास रोखायचा आहे, दुष्काळावर मात करूण भरपूर पाऊस पडण्यासाठी व शुध्द हवेसाठी झाडे लावयची आहे, पाणी अडवून, जीरवून वाचवायचे आहे, म्हणून सर्वांनी प्रतिज्ञा केली पाहिजे पर्यावरण संवर्धन हा माझा जन्मसिध्द अधिकार आहे आणि तो मी जोपासणारच... झाडे लावून जगवली पाहिजे, पाणी वाचवले पाहिजे, लोकमान्य टिळकांसारखी जिद्द अंगी कारा म्हणजे अशक्य काहिच राहनार नाही. अशा प्रकारे विद्यार्थ्यांना प्रेरणादेत त्यांनी लोकमान्य टिळकांची माहीती सांगीतली. यावेळी
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ.जयश्री बारी मँडम या होत्या यावेळी व्यासपिठावर मुख्याध्यापक चैतन्य कोंडे, दिपक सोनवणे सर हे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वैभव बोरनारे सर यांनी केले. सुत्रसंचालन दिपक सोनवणे सर यांनी केले तर आभार रितेश पाटील सर यांनी मानले यावेळी
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रिती भंगाळे, स्वाती चौधरी, नयना पोहेकर, दिपाली चौधरी, चारूशीला मँडम यांसह सर्व शिक्षकांना सहकार्य केले. यावेळी मोठ्या संखेने विद्यार्थी उपस्थित होते. या वेळी विद्यार्थ्यांनमधुन २५ विद्यार्थ्यांनी लोकमान्य टिळकांन बद्दल माहिती सांगीतली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
फोटोत मनोगत व्यक्त करतांना विद्यार्थीनी व्यासपिठावर माजी सैनिक सुधाकर धनगर, मुख्याध्यापक चैतन्य कोंडे, जयश्री बारी मँडम, दिपक सोनवणे सर
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अनोळखी मृतदेह माधव खाबिया :- पोलीस उप निरीक्षक, किरण विठठल जगदाळे नेम वणी पोलीस ठाणे, नाशिक ग्रामिण यांचे कडे दाखल अ...
-
विजयी उमेदवारांनवर गुलाल टाकताना पॅनलचे उमेदवार संदीप अवधूत :- ओझरखेड येथील डॅम च्या सोसायटीचे मतदान जि प प्रार्थमिक शाळा कृष्णागांव येथे...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा