Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, १८ जुलै, २०१९
ताजपूरी येथे शिक्षणपरिषद
कुरखळी: प्रतिनिधी (योगेश्वर मोरे )
शिरपूर तालुक्यातील बीट नं 2 अंतर्गत सावळदे व जातोडे केंद्रांतर्गत शिक्षकांची शिक्षण परिषद ही शिक्षण विस्तार अधिकारी गोपाल कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सावळदे केंद्रप्रमुख एम. बी. देवरे जातोडे केंद्रप्रमुख नारायण जमादार यांच्या प्रमुख उपस्थितीत जि. प. शाळा ताजपूरी येथे आयोजित करण्यात आली.
सर्व प्रथम राकेश पाटील शिक्षक जि. प. शाळा बाभूळदे यांनी मानव संसाधन विकास विभाग भारत सरकार द्वारे निर्माण केले गेलेल्या पीजीआय टूल बाबत पीपीटी द्वारे सखोल मार्गदर्शन करून माहिती दिली.
केंद्रप्रमुख देवरे यांनी गुणवत्ता विकासासाठी राबवण्यात येणाऱ्या विविध शैक्षणिक उपक्रमांबाबत शिक्षकांशी चर्चा
केली.सीआरजी बाबत सदस्य शिक्षकांना मार्गदर्शन केले. शिक्षण विस्तार अधिकारी गोपाल कुमावत यांनी शाळेतील भौतिक सुविधा, प्रशासकीय बाबी, डिजीटल क्लासरूम, शालेय पोषण आहार योजना, चित्रकला स्पर्धा, मोफत गणवेश योजना आदींवर मार्गदर्शन केले.
केंद्रप्रमुख नारायण जमादार यांनी पीजीआय बाबत शाळा स्तरावर ठेवायच्या नोंदी बाबतीत माहिती दिली .टँग व तेजस बाबत श्रीमती कल्पना पाटील व सहकारी शिक्षिकांनी इंग्रजी उपक्रमांचे सादरीकरण केले. तसेच इंग्रजी पेटीतील साहित्य वापराबाबत माहिती दिली. शाळा प्रगत होण्यासाठी राबवण्यात आलेल्या विविध उपक्रमांविषयी खर्देपाथर्डे प्रगत शाळेचे मुख्याध्यापक योगेश पाटील, राकेश पाटील बाभूळदे , वसंत कोळी मुख्याध्यापक गिधाडे, प्रभाकर मेटकर सर पिंप्री यांनी मार्गदर्शन केले.
याप्रसंगी सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी दिंडोरी तालुक्यातील वनारवाडी येथील डमाळे वस्ती येथे घरफोडी करून रोख रकमेसह सोन्याचे दागिने लांबवणार्या गुजरात र...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा