Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, १७ जुलै, २०१९
चिनावल येथे घाणीमुळे नागरिकांचे आरोग्य घोक्यात.
रावेर। प्रतिनिधी (अजीज शेख रावेर)
तालुक्यातील चिनावल येथील अनेक कालावधीपासून गावातल्या गावठाण परिसरात सांडपाण्याचे डबके व घाणीचे साम्राज्य पहावयास मिळत आहे. देशात एकीकडे भारत स्वच्छ अभियान राबविले जात असून गावागावात स्वच्छता मोहिम राबविली जात आहे. परंतु याठिकाणी कुठल्याही प्रकारची स्वच्छता मोहिम
राबविली जात नसल्याचे दिसून येत आहे. या ठिकाणची दखल कोणत्याच पद्धतीने ग्रामपंचायत सदस्य घेत नसल्याने, ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत आहे.
पावसाळ्यापूर्वीची साफसफाईकडे दुर्लक्ष केल्यामुळे रावेर तालुक्यातील चिनावल येथे ठिकठिकाणी असलेल्या गटारी तसेच गल्ल्यातील नाल्या तुटुंब भरल्या आहेत. त्यामुळे सर्वत्र दुर्गंंधी पसरली असून
परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. दरम्यान महिन्याभरापासून पावसाच्या पावसाळा सुरू झाल्यामुळे साथरोग बळावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. चिनावल गावाचे ठिकाण असल्यामुळे स्वच्छतेकडे लक्ष देणे गरजेचे आहे. ग्रामपंचायत तसेच कर्मचारी फक्त अर्थपूर्ण कामाकडे लक्ष देत असल्यामुळे नागरिकांना सुखसुविधा मिळणे कठिण झाले आहे. कचरा जमा करण्यासाठी गावात फिरणारी घंटागाडी महिना-
पंधरादिवसातून कधी कधी दिसते. त्यामुळे अनेक वार्डातील विविध ठिकाणी घाणीचे साम्राज्य दिसून येत आहे.या गटारीत तसेच अनेक ठिकाणी घाण कुजत असल्यामुळे सर्वत्र दुर्गंंधी पसरून परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
याशिवाय अंतर्गंंत रस्त्यांची दूरवस्था झाली आहे. काही जुन्या रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. तर नवीन रस्त्यांच्या दर्जा सुमार असल्यामुळे ठिकठिकाणी घाण पाणी साचत आहे. त्याचाही परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे.त्यामुळे गावातील भरपूर जण दवाखाण्याचे फेऱ्या मारत आहे.या घाणी मुळे मोठ्या प्रमाणात रोगराई पसरली असून घाण जीवघेणे सारखे झाले आहे.
"मी चिनावल येथील पठाण वाडी मध्ये राहत असून माझ्या घरासमोर असलेल्या सांडपाण्याच्या नाल्यात साचलेल्या पाण्या मुळे मी आजारी झालो."शेख मोहसीन शेख कुतबुद्दीन
"विजया झोपे. वैधकीय अधिकारी चिनावल"
"सध्या वातावरणामुळे दवाखान्यात ओपीडी ची संख्येत वाढ झाली असून प्रत्येकांनी आपला परिसर स्वच्छ ठेवावा.तसेच आमचे एम पी डब्ल्यू एस आर ठाकूर यांनी साचल्यापाण्यात गप्पीमाशे सोडलेले आहेत.यासंदर्भात गावपरिसरात स्वच्छते ठेवण्या बाबत पत्र ग्रामपंचायत चिनावल यांना देण्यात आले आहे."
"वेळो वेळी ग्रामपंचायत यांना या घाणी बाबत सुचित केल्या नंतर ही ग्रामपंचतीकडून वॉर्ड नंबर ४ मध्ये गटारीची साफ सफाई होत नाही तरी ग्रामपंचत ने या भागात वेळो वेळी साफ सफाई व गटारीचा उपसा करावा."
""शेख इरफान शेख कुतबुद्दीन ग्रामस्थ चिनावल""
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर (प्रतिनिधी) शहरात वाढत्या अंमली पदार्थांच्या विळख्याला आळा घालण्यासाठी शिरपूर शहर पोलीस ठाण्याच्या डी.बी. पथकाने धडाकेबाज कारवाई करत ...
-
बापू चव्हाण नाशिक दिंडोरी तालुक्यात आज गुरुवार दि.२ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास अवकाळी पावसाने वादळी वारा व विजांच्या क...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा