Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, १७ जुलै, २०१९

पाल येथे गुरुपौर्णिमेनिमित्त हजारो भाविकांनी घेतले गुरुदर्शन




(पर्यटन विकास योजने अंतर्गत आमदार हरिभाऊ जावडेच्या प्रयत्नाने आश्रम पुल व भक्त निवास ला मंजूरी, आमदार ऐकनाथ खडसे च्या हस्ते भूमिपूजन)




रावेर (प्रतिनिधी)अजीज शेख : परम पूज्य सदगुरु संत श्री लक्ष्मण चैतन्य बापूजी च्या दर्शनाकरिता  देशभरातून पन्नास हजाराच्या वर भाविक गुरुपौर्णिमेनिमित्त सातपुडा पर्वताच्या कुशीतिल पाल श्री वृन्दावन धाम आश्रमात दाखल होऊन दर्शन घेतले.

 गुरुपौर्णिमेच्या पावन प्रसंगी पाल येथे परम पूज्य सदगुरु संत श्री लक्ष्मण चैतन्य बापूजी स्थापित श्री वृन्दावन धाम आश्रमात दी १६ जुलै रोजी सकाळी ०५ वाजेपासुन श्री हरिधाम मंदिरात स्थित पूज्य बापूजी चे समाधि दर्शनासाठी भाविकांची रिघ लागली असता त्यानंतर सकाळी ०७ वाजेला पदस्थ श्रधेय संत श्री गोपाल चैतन्य बापूजी च्या 

सानिध्यात पादुका पूजन , आरती आणि अखिल भारतीय चैतन्य साधक परिवाराचे ध्वज चे अनावरण करण्यात आले त्यानंतर गुरुदीक्षा,आलेल्या मान्यवरा चे श्रद्धावचन तसेच सत्संग अमृताचा कार्यक्रम पार पडले त्यानंतर पाल आश्रमात भाविककरिता पर्यटन विकास योजने अंतर्गत साठ लाखाचा निधि पुलाकरिता आमदार 

हरिभाऊ जावले यांच्या प्रयत्नाने मंजूर करण्यात आले आहे त्याच बरोबर भक्त निवासकरिता पस्थीस लाख ,तसेच आमदार हरिभाऊ राठोड यवतमाळ यांच्या आमदार निधितुन विस लाख मंजूर व खासदार रक्षाताई खडसे यांच्या निधितुन सत्संग पंडाल करिता पंचवीस लाखचे निधि मंजूर करण्यात आले असून याचे भूमिपूजन माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांच्या हस्ते करण्यात आले.

 गुरुपौर्णिमेच्या पावन प्रसंगी आश्रमचे विद्यमान गादीपति श्रधेय संत श्री गोपाल चैतन्य जी महाराज यांच्या अमृत वाणीचा लाभ साधक परिवारांनी घेतले त्यामधे श्रधेय बाबाजी पुढे म्हणाले की गुरुविना भवसागर मनुष्य पार होऊ शकत नाही .परमेश्वर हे गुरूच्या नजिक असतात तर गुरुच्या सनिध्यात शिष्य राहिल्यास त्याचा उद्धार नक्की च आहे.गुरुच्या मार्गदर्शनाने शिष्याला भविष्याची योग्य दिशा कळते व चांगले गुण अंगी घेतल्यास परमेश्वराची प्राप्ति होते असे भाविकाना संबोधित केले.आमदार हरिभाऊ जावले यांनी 

श्रद्धावचनात माजी महसूल मंत्री नाथाभाऊ मंत्री असतांना चैतन्य कुम्भ सोहळा २०१४ साली पाल ला परम पूज्य संत श्री लक्ष्मण चैतन्य बापूजी च्या नावानी फलोद्यान महाविद्यालय याची स्थापना करण्याचे आश्वासन दिले होते ते अपूर्ण असलेले कार्य येणाऱ्या काळात पूर्ण करण्यात येईल असे आस्वासन दिले त्यानंतर माजी महसूल मंत्री यानी पूज्य बापूजिचे आशीर्वाद माझ्यावर असून याचे परतफेड करण्यकरिता ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या ग्रामविकास पर्यटन निधितुन पाल आश्रमाकरिता एक कोटि चा 

विकासकामाला मंजूर करुण आननार असल्याचे आश्वासन उपस्थित हजारो भाविकामधे दिले यावेळी माजी आमदार शिरिष चौधरी,अनिल चौधरी,भीकनगांव मध्यप्रदेश चे आमदार झुमा 

सोलंकी,खासदार प्रतिनिधि नंदा ब्राम्हणे, माजी आमदार धुरसिंग डावर,रावेर पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे, औरंगाबाद चे मारुति भाऊ, राजस्थान समितीचे रामअवतार, पंजाब चे नवतेज जी ओलखा, तसेच अमोल पाटिल,पी के महाजन,यावल चे हर्षल पाटिल, रावेरचे पद्माकर महाजन,यावलचे हिराभाऊ चौधरी,माजी शिक्षण अधिकारी एस के पवार,पालचे कामिल तड़वी,उपसरपंच राजू चौधरी,माजी सरपंच अर्जुन जाधव,ईस्माइल 

तड़वी,रघुनाथ चव्हाण  नरसिंग पवार, धनसिंग पवार ,आदि उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध