Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, ३ एप्रिल, २०२६
Home
/
Unlabelled
/
शिरपूर पोलिसांचा ड्रग्ज माफियांवर मोठा घाव; एम.डी.सह आरोपी जेरबंद, १० लाखांचा मुद्देमाल जप्त
शिरपूर पोलिसांचा ड्रग्ज माफियांवर मोठा घाव; एम.डी.सह आरोपी जेरबंद, १० लाखांचा मुद्देमाल जप्त
शिरपूर (प्रतिनिधी) शहरात वाढत्या अंमली पदार्थांच्या विळख्याला आळा घालण्यासाठी शिरपूर शहर पोलीस ठाण्याच्या डी.बी. पथकाने धडाकेबाज कारवाई करत एम.डी. (मेफेड्रोन) या घातक ड्रग्ससह एका आरोपीला रंगेहात पकडले. या कारवाईत तब्बल १० लाख १६ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याने ड्रग्ज माफियांमध्ये खळबळ उडाली आहे.
दि.२ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळच्या सुमारास पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, जयपाल प्रकाशसिंग गिरासे (वय ३८, रा. पळासनेर, ता. शिरपूर) हा इसम पांढऱ्या रंगाच्या हुंडाई व्हेन्यू (MH 14 KF 8682) या कारमधून एम.डी. ड्रग्सची वाहतूक करणार असल्याचे समजले. या माहितीच्या आधारे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने सापळा रचण्यात आला.
पोउपनि संदीप दरवडे यांच्या नेतृत्वाखाली राजपत्रित अधिकारी, पंच, फॉरेन्सिक टीम व पोलीस कर्मचाऱ्यांसह शहादा फाटा परिसरात सापळा लावण्यात आला. दरम्यान संशयित वाहन दिसताच पोलिसांनी थांबवण्याचा इशारा केला असता चालकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी चपळाईने पाठलाग करून जय भद्रा टी-पॉईंट येथे वाहन अडवून आरोपीला ताब्यात घेतले.
तपासादरम्यान आरोपीच्या पॅन्टच्या खिशात २०.८४ ग्रॅम एम.डी. (मेफेड्रोन) हा अंमली पदार्थ आढळून आला. या ड्रग्सची किंमत सुमारे ६ लाख रुपये असून वाहनासह एकूण मुद्देमाल १०,१६,८०० रुपये इतका असल्याचे स्पष्ट झाले.
या प्रकरणी आरोपीविरुद्ध गुंगीकारक औषधी व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ अंतर्गत कलम ८(क), २२(ब), २९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याने हा अंमली पदार्थ कुणाकडून आणला याचा सखोल तपास सुरू आहे. पुढील तपास पोउपनि सुरेश सोनवणे करीत आहेत.
ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे तसेच प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वजीत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
या धडाकेबाज कारवाईत सहभागी डी.बी. पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची नावे
पुढीलप्रमाणे —
पोहेकॉ/ रवींद्र आढळदमल, पोहेकॉ/ अतुल पाटील, पोहेकॉ/ सचिन माळी, पोकॉ/ योगेश दाभाडे, विनोद अकडमल, गोविंद कोळी, प्रशांत पवार, भटू साळुंके, मनोज दाभाडे, सचिन वाघ, मनोज महाजन, आरिफ तडवी, प्रशांत बाविस्कर, उमेश पवार, गोपाल माळी, शांतिलाल पावरा, सतीष भामरे, सोमा ठाकरे तसेच चापको/ रविंद्र महाले, जगन्नाथ माळी व होमगार्ड मिथुन पवार व राम भिल यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली.
शिरपूरमध्ये वाढत्या ड्रग्ज व्यवहारावर पोलिसांचा हा मोठा प्रहार मानला जात असून, या कारवाईमुळे ड्रग्ज साखळी उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नागरिकांकडून या कारवाईचे स्वागत होत असून, “आता ड्रग्ज माफियांवर आणखी मोठी कारवाई होणार का?” असा सवाल उपस्थित केला जात आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
संदीप अवधूत :- नाशिक जिल्हयातील अतिदुर्गम भागात डोंगर, द-यांमध्ये तसेच नदी, नाले, पाण्याचे डोह असलेल्या विविध ठिकाणांवर छूप्यारित्या सुरू अस...
-
धुळे (प्रतिनिधी) – धुळे जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्राला हादरा देणारा प्रचंड मोठा घोटाळा अखेर उघडकीस आला आहे. विशेष तपास पथकाच्या (SIT) सखोल चौ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा