धुळे :(प्रतिनिधी )परिवहन अधिकारी (RTO) परवेज़ खुदायारखाँ तड़वी यांनी तक्रारदाराकडे ४ लाख ५० हजार रुपयांची लाच मागितली. तक्रारदाराने नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर पथकाने २ जुलै रोजी पंचासमक्ष पडताळणी केली. पडताळणीमध्ये तडवी याने लाच स्विकारण्याचे कबुल केले होते. त्यानुसार आज तडवी याच्याविरुद्ध लाच लुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी डोनदिगर येथील ३७ वर्षीय व्यक्तीने नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. परवेज़ खुदायारखाँ तड़वी हे धुळे येथे प्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून कार्य़रत आहेत. तक्रारदार यांना नियमा प्रमाणे समान
चक्राकार पद्धतीने देण्यात येणाऱ्या सिमा तपासणी नाका येथील नेमणुक देण्याच्या मोबदल्यात साडेचार लाखांची लाच मागितली. तक्रारदार यांनी लाचेची तक्रार केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पंच साक्षीदार यांचे समक्ष पडताळणी केली. यावेळी तडवी याने साडेचार लाख रुपयांची मागणी करुन ती स्विकारण्याचा प्रयत्न केला.
ही कारवाई नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक सुनिल कडासने, अपर पोलीस अधीक्षक निलेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंतकुमार भामरे यांच्या पथकाने केली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा