दोंडाईचा प्रतिनिधी : ना.जयकुमारभाऊ रावल यांनी मंजूर केलेला १३० कोटीचा शिंदखेडा तालुक्याच्या सर्वात महत्वाचा धावडे- दोंडाईचा- विरदेल- शिंदखेडा- नरडाणा- बेटावद हा हायब्रीड ॲन्यूईटी योजनेअंतर्गत मंजूर असलेल्या रस्त्याचे काम अत्यंत जलद सुरू असून त्यातील
धावडे- दोंडाईचा- शिंदखेडा हा रस्ता काही छोटछोट्या पुलांचे काम वगळता जवळपास पुर्ण झाला आहे. तर शिंदखेडा- नरडाणा- बेटावद या रस्त्याचे काम अत्यंत जलदगतीने सुरू असून येत्या काही महिन्यात त्याचे काम पुर्ण होणार आहे.
या रस्त्यातील शिंदखेडा- विरदेल हा रस्ता वाळुच्या अवजड वाहतूकीमुळे त्याची अत्यंत दुर्दशा झालेली होती, त्यासाठी कॉंग्रेस शासनकाळापासून त्याच्या सुधारणा साठी ना. जयभाऊ रावल यांनी वारंवार पाठपुरावा करूनही त्याकडे शासनाने दुर्लक्ष केले होते परंतु भाजप शासनकाळात तब्बल १३० कोटीचा अत्यंत मजबूत, दर्जेदार, ११
मीटर लांब रुंदीचा रस्ता तयार झाला असून बाम्हणे, धमाणे, विरदेल, शिंदखेडा या गावात कॉंक्रीटीकरण, भूमीगत गटारी यात होत आहेत. शिवाय १० वर्षे देखभाल व दुरुस्ती पूर्णतः ठेकेदाराकडे असणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा