प्रतिनिधी (अजीज शेख )निंभोरा बुद्रुक ता.रावेर येथिल रहिवाशी हल्लीमुक्काम कल्याण पूर्व या तरूणाची २७ गाव संघर्ष समिति कल्याण चे उपाध्यक्ष व राष्ट्रवादी कांग्रेस चे अंबरनाथ तालुका अध्यक्ष
विलासभाई म्हात्रे, स्वस्तिक पार्क चे अध्यक्ष संजुशेठ जोशी व विनोद भोईर यांच्या हस्ते नुकतेच नियुक्ति पत्र देवून कल्याण पूर्व शहर उपाध्यक्षपदी बिनविरोध निवळ करण्यात आली. पंकज रामदास महाजन हे मुळ रावेर तालुक्यातील निंभोरा येथिल रहिवाशी आहे. बऱ्याच वर्षांपासून नोकरी निमित्ताने ते कल्याण पूर्व मध्ये वास्तव्याला आहे यांची कल्याण मधील राजकीय ओळख, बिल्डर लॉबीशी घनिष्ठ संबंध आणि सामाजिक कार्यातील सहभाग लक्षात घेऊन त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस
पक्षाच्या कल्याण पूर्व शहर उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. कल्याण पुर्व शहरामध्ये खान्देशी वर्ग मोठ्या संख्येने असुन या समाजाला एकत्र आणण्याचे कार्य पंकज महाजन करत आहे आणि हेच खान्देशी एक गठ्ठा मतदान पंकज महाजन यांच राजकीय वजन वाढवत आहे. यावेळी रघुनाथ राजपूत, दत्तु भोर, विनोद बारी, देवेन्द्र पाटिल, संतोष अडके, सुनिल राजपूत, किरण बऱ्हाटे, किरण पाटिल,
शिवाजी राऊत, सचिन डिचोलकर, विजय भंगाळे, राकेश मिश्रा, सचिन जरे, अमोल पाटिल, ओमकार खरात, कन्हैया विचवे, पवन पाटिल, तुषार बऱ्हाटे व चिंचपाडा गावातील राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी चे
कार्यकर्ता उपस्थित होते. या निवडि बद्दल निंभोरा येथील राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद बोंडे, राष्ट्रवादी ओबीसी सेल,रावेर चे तालुका अध्यक्ष सुनिल कोंडे, प.स.सदस्य दिपक पाटील.... आदिंनी अभिनंदन केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा