रावेर: प्रतिनिधी (अजीज शेख) आज दिनांक 12/07/2019 रोजी श्रीराम मॅक्रो व्हिजन ॲकेडमी, रावेर या शाळेत सी.बी.एस.ई. इंग्रजी माध्यमाच्या विभागत आषाढी एकादशी विविध कार्यक्रम घेवून मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. टाळ, मृदंग, भजन तसेच किर्तनाच्या
गजरात आषाढी एकादशी उत्साहात साजरी करण्यात आली. आज श्रीराम परिवारात अवघी पंढरी जमा झाल्याचा भास होतोय. आमचे चिमुकले बाल गोपळ वारकरी, प्रत्यक्ष विठ्ठल-रुख्माई पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आषाढी एकादशी निमित्त हा दिंडी सोहळा पार पडला. आषाढी एकादशी म्हणजे रायनी एकदशी, आषाढी
एकादशीला महा-एकादशी सुध्दा म्हणतात. शाळेतील विद्यार्थ्यांनी कोणी विठ्ठल-रुक्मिणीचे तर काही विद्यार्थ्यांनी संत सावता माळी, संत तुकाराम, संत निवृत्ती ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई अशा वेगवेगळया संतांच्या वेशभूषा परिधान करुन सर्वांचे लक्ष वेधले.
श्रीराम मॅक्रो व्हिजन ॲकेडमी स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. कविता शर्मा यांनी पालखीचे पूजन करुन मुलांना आषाढी एकादशीची माहिती दिली तसेच विद्यार्थ्यांना प्रात्साहन दिले व त्यांचे कौतुक केले.
सदर कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष श्रीराम पाटील, सचिव स्वप्निल पाटील, शाळेचे व्यवस्थापक किरण दुबे तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वितेसाठी श्रीराम मॅक्रो व्हिजन ॲकेडमी स्कूलचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्रीराम मॅक्रो व्हिजन ॲकेडमी स्कूलची विद्यार्थ्यांनी सजंना नाईक हिने केले. कार्यक्रमाची सांगता पसायदानाने करण्यात आली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा