Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, २१ जुलै, २०१९
न्युबोराडी येथे विकासकामांचे उद्घाटन
शिरपूर: प्रतिनिधी (सुभाष भोई )भाजपा शासनाच्या काळात ग्रामीण भाग केंद्रबिंदू मानुन विकासकामांना प्राधान्य देण्यात येत आहे.गावाचा विकास झाला तरच देशाचा विकास होईल म्हणून ग्रामीण,दुर्गम
भागातील रस्ते,पिण्याचे पाणी,शेततळी अशी विकासकामे करण्यात येत आहेत असे प्रतिपादन राहुल रंधे यांनी केले.
शिरपूर तालुक्यातील न्युबोराडी येथे विकासकामांचे उद्घाटन करण्यात आले.
दलित वस्ती योजना व डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना तसेच ग्रामविकास 2515, योजने अंतर्गत न्यू बोराडी येथे पेव्हर ब्लॉक बसविणे व रस्ता काँक्रीटीकरण करणे या कामाचे भूमिपूजन भाजपाचे शिरपूर तालुकाध्यक्ष राहुल रंधे व पंचायत समितीचे सदस्य दिलीप जामसिंग तडवी यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून न्युबोराडीच्या सरपंच ज्योतीबाई तडवी,जमादार पावरा,शिलदार पावरा,छगन सत्तेसा,धगन पाडवी,प्रल्हाद नगराळे, भिलाभाऊ कुवर,प्रताप धारवे,सुनील वळवी,सुनिल मालसे,कालुसिंग पाडवी,देविदास नगराळे,मिलिंद नगराळे,तुकाराम पावरा,खुमसिंग पावरा एस.जी.पावरा इ.उपस्थित होते.
शिरपूर तालुक्यातील सात गावासाठी भाजपा तालुकाध्यक्ष राहुल रंधे यांच्या प्रयत्नातून पेव्हर ब्लॉक बसविण्यासाठी ८६ लक्ष रुपयांचा निधी मंजूर करून काम सुरू झाले आहे. हयात थाळनेर येथे ५ लक्ष रुपये,विखरण ७लक्ष रुपये, बुडकी गावाला १० लक्ष रुपये,न्यु.बोराडी ला ७ लक्ष
रुपये,तऱ्हाडकसबे २ लक्ष रुपये, उंटावद ५ लक्ष रुपये, व बोराडी ला ५० लक्ष रुपये निधी मंजूर झाला आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेरात संशयास्पद गोळीबारात तरुणाचा मृत्यू; पोलिस तपास सुरू अमळनेर (प्रतिनिधी) – शहरातील शाह आलम नगर परिसरात एका तरुणाचा गोळी लागून मृत्यू ...
-
शिरपूर (प्रतिनिधी) राज्य उत्पादन शुल्क विभागाने शिरपूर तालुक्यात मोठी कारवाई करत अवैध मद्यसाठ्यावर घाव घातला आहे. देवदत्त नेहळे, निरीक्षक र...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा