Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, २१ जुलै, २०१९
दाऊळ येथे पीक विम्याबाबत मार्गदर्शन
शिंदखेडा : प्रतिनिधी (योगेश्वर मोरे )
दि. 20 जुलै रोजी दाऊळ ता. शिंदखेडा येथे प्रधानमंत्री पीक विमा योजनेची माहिती व दस्तावेजांची अंमलबजावणी कामी शिंदखेडा तालुका कृषी अधिकारी श्री. दिलीप भोई यांना दाऊळ ग्रा. प. प्रथम लोकनियुक्त सरपंच सौ शोभा दिलीप पवार यांनी पीक विमा योजनेबाबत योग्य
मार्गदर्शन व फ्रॉम भरण्याची कार्याआयोजन प्रक्रिया राबविण्यासाठी ग्रा. प. कार्यालय दाउळ येथे बोलावण्यात आले होते. महा ई सेवा केंद्र प्रमुख दीपक पावरा यांच्या मार्फत ग्रामपंचायत कार्यालयात पीक विम्याचे फॉर्म भरण्याची प्रक्रिया पूर्ण केली. जवळपास गावातील 60 शेतकरी लाभ घेतला. हा camp दोन दिवसासाठी आयोजित करण्यात आलेला असुन दाऊळ सह परिसरातील शेतकरी बांधवांनी लाभ घ्यावा असे आव्हान सरपंचानी केले.
या प्रसंगी उपसरपंच पांडुरंग जाधव, सदस्य विजय पाटील , प्रेमसिंग गिरासे, सुशीला नाईक , दिलीप पवार , भाजप युमो ता अध्यक्ष तुषार पवार , किरण पवार , छोटू माळी , रतनसिंग गिरासे, दाजभाऊ माळी , कुणाल पवार , आप्पा माळी , बाबूलाल माळी , योगेश जगताप , नाना पवार , छोटू पवार , रवींद्र चौधरी, नामदेव सैदाने, रतन बोरसे इतर मान्यवर उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बेटावद / शिरपूर (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (PSE) इ...
-
शेळगावातील तरुणांचा दारूबंदीचा निर्धार; ग्रामस्थांच्या वतीने माजी सैनिकासह दोघांचे आमरण उपोषण परंडा, दि. १२ : शेळगाव ग्रामसभेने ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा