Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, १५ जुलै, २०१९
खिजर उर्दू हायस्कूल चिनावल ता. रावेर जि.जळगाव
प्रतिनिधी :(अजीज शेख) चिनावल येथील खिज़र एज्युकेशन सोसायटी संचलित खिजर उर्दू हायस्कूल चिनावल आज जलशक्ती अभियान 2019 अंतर्गत जलसाक्षरता शपथ देण्यात आली भारताचा एक जागरुक आणि योग्य दृष्टीचा भावी नागरिक घडावा आणि एक सशक्त असा जलसाक्षर समाज तयार व्हावा यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला.याप्रसंगी
सांस्कृतिक समिती प्रमुख बासित खान सर व रमीज़ खान सर यांनी पाण्याचे महत्व, पाण्याचे संवर्धन,पाण्याचा पुनर्वापर, पाणीप्रश्न सोडवण्यासाठी करता येण्यासारख्या उपाय योजना याविषयी सविस्तर माहिती दिली.विद्यार्थिनी महेक भिकन,तंजीला इरफान हिने पाण्याविषयी मानवाचे कर्तव्य याबाबत माहिती
दिली.विद्यालयाचे मुख्याध्यापक निसार शेख सर यांनीही विद्यार्थ्यांना जलसाक्षर समाज घडावा याविषयी आवाहन केले.सदर जलशक्ती अभियानांतर्गत जलसाक्षरतेची शपथ उपशिक्षक अज़िम खान सर यांनी दिली.यावेळी एकूण 325 विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
नासिर खान सर यांनी सर्वांचे आभार मानले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर (प्रतिनिधी) शहरात वाढत्या अंमली पदार्थांच्या विळख्याला आळा घालण्यासाठी शिरपूर शहर पोलीस ठाण्याच्या डी.बी. पथकाने धडाकेबाज कारवाई करत ...
-
बापू चव्हाण नाशिक दिंडोरी तालुक्यात आज गुरुवार दि.२ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास अवकाळी पावसाने वादळी वारा व विजांच्या क...



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा