Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, १५ जुलै, २०१९
अमळनेर तालुक्यात मुडी परिसरात पाऊसाने दडी मारल्याणे दुबार पेरणी
प्रतिनिधी :(गणेश चव्हाण) अमळनेर तालुक्यात मुडी परिसरात पाऊसाने दडी मारल्याणे
एकुण ६८ हजार हेक्टर हे 7 खरीप क्षेत्र आहे. यापैकी ५२ हजार हेक्टरवर जिराईत पेरणी अन् कापूस लागवड झाली आहे. परंतु पेरणीनंतर पाऊस न आल्यामुळे
नुकतीच उगवलेली पिके कोमेजली आहेत. तसेच पेरणी खोळंबलेल्या असून शेतक-यांचा जीव टांगणीला
लागला आहे. त्यात मुड़ी भरवस वावडे, लोणपंचम, कळंबू, ब्राम्हणे बोदडे, एकलहरे या भागात अद्यापही
कमी अधिक पाऊस आहे.
मुडी परिसरात काही ठिकाणी
। जून अखेरीस सुरुवातीला पावसाने हजेरी लावल्याने पेरणी आणि कापूस
लागवड करुन बळीराजा खरिपाच्या कामाला लागला होता. तालुक्यातील
८ कृषी मंडळात मारवड, भरवस,वावडे, अमळगाव या मंडळात सुरुवातीला पाऊस झाला. त्यामुळे शेतक-यांनी उडीद, मूग, कापूस मका, जिवारी आदी पिकांची पेरणी केली. या पिकांचे कोंब नुकतेच जमिनीवर
आले आहेत. पण, त्यांना पाणी न मिळाल्याने ती सुकून जळाली असून त्यांना आता दमदार पावसाची गरज
आहे. मात्र 8 दिवसापासून पाऊस गायब झाल्याने पिकांच्या वाढीवर परिणाम झाला आहे. वावडे, भरवस
या दोन महसूल मंडळातील शेतकरी पावसाच्या चिंतेने हवालदिल असून आता काही ठिकाणी दुबार कपाशी
लागवड व पेरणी केली जात आहे.पावसाने जून अखेर चांगली सुरुवात केल्यानंतर काही आठवड्यापासून मुडी
परिसरात पावसाने दडी मारल्याने तालुक्यातील १२ हजार हेक्टर क्षेत्रावरील पेरणी धोक्यात आली आहे. तालुक्यात एकूण ५२ हजार
हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे.परंतु, पावसाने मुडी परिसरात दडी मारल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला
आहे. सुरुवातीच्या पावसावर कापूस लागवड आणि पेरण्या झाल्या होत्या, मात्र पावसाअभावी पुन्हा
कपाशी लागवड करण्याची वेळ आता शेतकयांवर आली आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर (प्रतिनिधी) शहरात वाढत्या अंमली पदार्थांच्या विळख्याला आळा घालण्यासाठी शिरपूर शहर पोलीस ठाण्याच्या डी.बी. पथकाने धडाकेबाज कारवाई करत ...
-
बापू चव्हाण नाशिक दिंडोरी तालुक्यात आज गुरुवार दि.२ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास अवकाळी पावसाने वादळी वारा व विजांच्या क...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा