जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीकडे तक्रार, महसूल विभागात खळबळ
यावल:प्रतिनिधी (अजीज शेख) येथील तत्कालीन तहसीलदार राहुल मुंडके यांनी 2008 मध्ये यावल तालुक्यात पिंप्री शिवारात शेती खरेदी केलेली असल्याने त्यांची विनाविलंब विभागीय चौकशीची करून शिस्तभंगाच्या कारवाईची मागणी
जळगाव येथील विजयकुमार काकडे यांनी जिल्हाधिकारी जळगाव तथा अध्यक्ष जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीकडे केल्याने संपूर्ण महसूल विभागात व शासकीय अधिकारी कर्मचारी वर्गात एकच खळबळ उडाली आहे.
विजयकुमार काकडे यांनी शासकीय स्तरावरील जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीकडे दि २३ जून रोजी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, यावल येथील तत्कालीन तहसीलदार राहून एकनाथ मुंडके यांनी आपल्या तहसीलदार पदाचा आणि अधिकाराचा दुरुपयोग करून त्यांच्या
कार्यक्षेत्रात असलेल्या दुय्यम निबंधक श्रेणी-1 यांच्याशी संगनमत करून मौजे पिंपरी शिवारातील गट नंबर 186 गट नंबर 187 शेती खरेदीचे दोन वेगवेगळे दस्तऐवज अनुक्रमे क्रमांक 372 / 2008 व 373 / 2008 नुसार खरेदी केले आहे, राहुल
एकनाथ मुंडके यांनी शेती खरेदी करताना नियमानुसार आवश्यक असलेला शेतकरी किंवा शेतमजुर असल्याचा दाखला पुरावा म्हणून जोडलेला नाही म्हणून त्यांच्यावर प्रशासकीय कारवाई करावी जेणेकरून महाराष्ट्रात अशा भ्रष्ट मार्गाने गैरमार्गाने कायद्याचा दुरुपयोग कोणीही उच्चपदस्थ अधिकारी किंवा कर्मचारी करणार नाही असे दिलेल्या तक्रारीत विजयकुमार नामदेव काकडे यांनी म्हटले आहे.
कागदपत्रे आढळून आली नाहीत, माहिती अधिकारात उघड
राहुल एकनाथ मुंडके तहसीलदार यावल यांनी यावल तालुक्यात पिंप्री शिवारात शेत गट नंबर 186 व गट नंबर 187 शेत जमीन विकत घेऊन नाव लावलेले आहे. त्यांचे नाव लावताना आपणाकडे दिलेल्या सर्व कागदपत्रांच्या छायांकीत प्रमाणित प्रती माहिती म्हणून मिळावी अशी माहिती
दिनांक 5/ 12 / 2018 रोजी मागण्यात आली होती त्यासंदर्भात तलाठी टाकरखेडा बोरावल पिप्री तालुका यावल येथील तलाठी यांनी माहितीबाबत शोध घेतला असता माहितीचे कागदपत्र आढळून आली नाही असे लेखी उत्तर दिले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा