Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, २७ जुलै, २०१९
Home
/
Unlabelled
/
पाचोरा महसूल विभागातर्फे गेल्या तीन महिन्यांत २३ वाहन धारकाकडून वीस लाखांचा दंड वसूल तर साठेबाजी करणाऱ्यांना नोटिसा
पाचोरा महसूल विभागातर्फे गेल्या तीन महिन्यांत २३ वाहन धारकाकडून वीस लाखांचा दंड वसूल तर साठेबाजी करणाऱ्यांना नोटिसा
पोलीस प्रशासन व महसूल विभाग यांची संयुक्तपणे कारवाई
पाचोरा (प्रतिनिधी) :- येथील महसुल विभागाने गेल्या तीन महिन्यात ३२ वाळू चोरीची वाहने पकडण्यात आले त्यापैकी २३ वाहन धारकाकडून विस लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे असून
नगरदेवळा परिसरात सापडलेल्या अवैध वाळू साठेबाजी करणाऱयांना नोटिसा बजावण्यात आल्या आहे. विभागात कर्मचारी संख्या मोजकी व कामांचा ताण असला तरी वाळू चोरांवर कार्यवाह्या सुरूच असतात.बऱ्याच वेळी कार्यवाही करतांना पोलिसांची मदत घ्यावी लागते असे तहसीलदार कैलास चावडे यांनी सांगितले.
पाचोरा तालुक्यात मागील काही
महिन्यांपासून वाळूचोरांनी हैदोस घातल्याने महसूल विभागाच्या कामकाजावर आणि अधिकाऱयांवर टीका होत आहे. या सर्व प्रकारांबाबत तहसीलदार श्री .कैलास चावडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, गेल्या तीन महिन्यात २० लाखाच्या दंडात्मक कार्यवाह्या करण्यात आल्या आहेत .पाचोरा तहसील आवारात सद्यस्थितीला १६ वाहने कार्यवाह्या साठी तहसिल आवारात उभी आहे. पाचोरा तालुक्यात वाळूचोरी समस्या गंभीर आहे. प्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांच्या
मार्गदर्शनात व आदेशाने मी स्वतः,सोबत नायब तहसीलदार, सर्कल,विवीध विभागाचे सर्कल, तलाठी व कर्मचारी दिवस-रात्र काळ वेळ- न पाहता कार्यवाह्या साठी तत्पर असतो.एवढे करूनही आमच्या विभागावर अकारण टीका होतात ही खेदाची बाब आहे. या चर्चेत वाळू चोरी करणारे गट सक्रिय आहे.
नगरदेवळा भागात हाती लागलेला अवैध वाळूसाठा ताब्यात घेतला असून सबधितांना दंडाच्या नोटिसा देण्यात आल्या आहेत .निपाणे रोडवर अनेक शेतात अवैध वाळूसाठे असल्याची माहिती मिळत आहे! सर्कल यांना शोधकामी आदेश दिले आहे. पाचोरा शहरातही अवैध वाळूसाठे
असल्याची माहिती मिळतअसून त्याच्याही तपासण्या होतील. तहसिलच्या आवारात गेल्या दोन-तीन वर्षांपासून जप्त केलेली वाहने दंडाच्या रकमा भरून घेऊन जावे म्हणून सबधितांना वारंवार नोटिसा बजावूनही त्याचे मालक ती वाहने घेवुन जात नाहीत.अश्या वाहनांचे लिलाव करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
महसुल प्रशासन कोणाच्याही दबावाखाली येणार नाही.आणि कोणाचीच गय केली जाणार नाही. वाळू चोरी बाबत जागरूक नागरिकांनी महसुल विभागास लेखी किंवा तोंडी कळविण्याचे देखील आवाहन तहसीलदार कैलास चावडे यांनी केले आहे
पोलीस प्रशासन व महसूल विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने वाळू चोरट्याविरुद्ध कडक कारवाई केली जात आहे कुणी विपर्यास करू नये
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी दि. १ ऑगस्ट : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या शिरपूर आगारात प्रवासी व विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी सुरू करण्यात आल...
-
जिल्हा परिषदेला वाळवी प्रमाणे पोखरणाऱ्या बांधकाम विभागातील वाघचा गळ्याचा ताईत असलेला कुणाल नेरकर हा ठेकेदार, जिल्हा परिषद असो की जिल्ह्यातील...



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा