Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, २७ जुलै, २०१९
Home
/
Unlabelled
/
शिर्डी येथे होनारा मेळाव्यास अमळनेर तालुक्यातून बहुसंख्येने जाणार सन्मा..सरपंच,उपसरपंच.
शिर्डी येथे होनारा मेळाव्यास अमळनेर तालुक्यातून बहुसंख्येने जाणार सन्मा..सरपंच,उपसरपंच.
दिनांक 31 जुलै 2019 रोजी शिर्डी येथे मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत होणाऱ्या सरपंच
अमळनेर प्रतिनिधी (संदीप सैदाणे) परिषदेस अमळनेर तालुक्यातून सुमारे 150/200 सरपंच,उपसरपंच जाणार असून यासंदर्भातील सविस्तर मार्गदर्शन आज अमळनेर प.स.येथील सानेगुरुजी
सभागृहात पार पडली.अखिल भारतीय सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष मा.पुरूजित चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली अमळनेर तालुका अध्यक्ष श्री सुरेश आर्जुन पाटील यांनी दिनांक 24 जुलै रोजी प.स.चे गट विकास अधिकारी श्री अजय कुमार नष्टे साहेब व सहाय्यक गटविकास अधिकारी श्री संदीप वायाळ साहेब यांना दिलेल्या निवेदनात तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतचे सरपंच,उपसरपंच यांना दिनांक 26 जुलै रोजी उपस्थित राहण्याचे आवाहन केले होते. त्या अनुषंगाने आज तालुक्यातून मोठ्या संख्येने ग्रामपंचायतीचे
सरपंच,उपसरपंच उपस्थित होते.यावेळी गटविकास अधिकारी श्री अजय कुमार नष्टे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली सभा पार पडली.सदर सभेत विविध विषयांवर चर्चा झाली असता, सर्व उपस्थित सरपंचांनी सहभाग नोंदविला. यावेळी झालेल्या सभेमध्ये कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून
गटविकास अधिकारी श्री अजय कुमार नष्टे साहेब तसेच, व्यासपीठावर सहाय्यक गटविकास अधिकारी श्री संदीप जी वायाळ साहेब,अमळनेर तालुका अध्यक्ष सुरेश पाटील सुंदरपट्टी महिला तालुकाध्यक्ष उज्वलाताई पाटील नगावकर अमळनेर तालुका उपाध्यक्ष श्रीमती कोकिळाबाई रामपुरी गोसावी हे उपस्थित होते.यावेळी झालेल्या कार्यक्रमात प.पू.साने गुरुजी यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते प्रतीमा पुजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.यावेळी झालेल्या कार्यक्रमात
प्रास्ताविकात तालुकाध्यक्ष श्री सुरेश पाटील यांनी शिर्डी येथील कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली यांनी मार्गदर्शन करताना सांगितले यानंतर गटविकास अधिकारी श्री नष्टे साहेब व सहाय्यक गटविकास
अधिकारी श्री वायाळ साहेब यांनी कार्यक्रम माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस व राज्याचे ग्राम विकास मंत्री नामदार सौ पंकजाताई मुंडे यांच्या उपस्थितीत होणार असून, या कार्यक्रमात सरपंच सबलीकरण या विषयावर मार्गदर्शन होणार आहे असे सांगितले. तरी आपल्या तालुक्यातुन
जास्तीत जास्त संख्येने आपण कार्यक्रमास उपस्थितीत राहावे.असे आवाहन त्यांनी केले.कार्यक्रम वेळेवर सुरू होणार असून आपल्याला कार्यक्रमाच्या अगोदर कसे पोहोचता येईल याबद्दल नियोजन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सुनील आहिराव सर यांनी केले आभार श्री महेश पाटील यांनी मानले.यानंतर सर्व उपस्थित पदाधिकाऱ्यांनी चर्चेत सहभाग नोंदवून अ.भा.सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष श्री सुरेश पाटील यांनी सभेत मांडलेले सर्व विषयांना एक मताने मंजुरी देण्यात आली. प्रत्येकाच्या सूचनांचे पालन उपस्थित सर्व मान्यवरांनी मान्य केले.यानंतर जुनोने
येथील सरपंच पती श्री सतीश पाटील यांनी कारगिल विजय दिनानिमित्त शहिदांना आदरांजली वाहण्याची सूचना मांडली.तर कारगिल विजय दिनानिमित्त शहीद जवानांना आदरांजली वाहून राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
यावेळी झालेल्या कार्यक्रम यशस्वितेसाठी विस्ताराधिकारी श्री चिंचोरे साहेब श्री राणे साहेब,श्याम पाटील व संघटनेचे पदाधिकारी व महिला सरपंच बहुसंख्येने उपस्थित होते सरपंच उपसरपंच यांनी मेहनत घेतली.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
विजयी उमेदवारांनवर गुलाल टाकताना पॅनलचे उमेदवार संदीप अवधूत :- ओझरखेड येथील डॅम च्या सोसायटीचे मतदान जि प प्रार्थमिक शाळा कृष्णागांव येथे...
-
शिरपूर प्रतिनिधी:- धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुका पोलिसांनी अमली पदार्थ तस्करीविरोधात मो...




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा