रावेर :प्रतिनिधी (अजीज शेख)
मुंबई येथील अतिवृष्टी मुळे रेल्वे सेवा विस्कळीत झाल्याने रावेर रेल्वे स्थानकावर अनेक तासापासून थांबून राहिलेल्या रेल्वे प्रवाश्यांना मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी महसूल प्रशासनाच्या पुढाकाराने
नगरपालिका आणि सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून दिलासा देण्यात आला
काल दि 1 जुलै रोजी मुंबई मध्ये झालेल्या पावसामुळे रेल्वे विभागाची वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाल्याने रावेर स्थानकावर महानगरी एक्स्प्रेस, पाटलीपुत्र, यासह काही गाड्या थांबून होत्या गाडीतील प्रवाश्यांची अवस्था अत्यंत बिकट झालेली होती. पिण्याच्या पाण्याची टंचाई भुकेमुळे लहान बालकांचा आक्रोश वाढत
असतांनांची माहिती प्रांताधिकारी अजित थोरबोले व तहसीलदार अभिलाषा देवगुणे यांना माहीत झाल्याने त्यांनी तात्काळ पुढाकार घेऊन नगरपालिका, ग्रामीण रुग्णालय, सेवाभावी संस्था अंबिका व्यायाम शाळा, श्रीराम फौंडेशन आणि मुस्लिम पंच कमिटी यांच्या सहकार्याने प्रवाश्यांना शुद्ध पिण्याचे पाणी, बिस्कीट पुडे, केळी,
अत्यावश्यक औषधी पुरवठा उपलब्ध करवून देण्यात आल्या याठिकाणी मुख्याधिकारी रवींद्र लांडे, वैद्यकीय अधिकारी डॉ बी बी बारेला, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ संदीप चौधरी,
अंबिका व्यायाम शाळा अध्यक्ष भास्कर महाजन, श्रीराम फौंडेशन सचिव दीपक नगरे यांच्यासह नगरसेवक सुरज चौधरी, सुधीर पाटील, असदुल्ला खान यांच्यासह मुस्लीम पंच कमेटीचे शे. गयास, युसुफ खान, आरिफ खान यांच्यासह पदाधिकारी व सर्व कर्मचारी तळ ठोकून होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा