Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, २७ जुलै, २०१९
Home
/
Unlabelled
/
राज्यात वाळु गोण्या विक्री डेपो सुरु करावेत महसुल मंत्री ना चंद्रकांत पाटील यांचाकडे भाजपा जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी यांची मागणी
राज्यात वाळु गोण्या विक्री डेपो सुरु करावेत महसुल मंत्री ना चंद्रकांत पाटील यांचाकडे भाजपा जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी यांची मागणी
शिरपुर:(प्रतिनिधी) राज्यात वाळु गोण्या विक्री डेपो सुरु करण्यात यावेत अशी मागणीचे निवेदन राज्याचे महसुल मंत्री ना.श्री.चंद्रकांत पाटील यांचाकडे करण्यात आली आहे. राज्यात सध्या वाळु लिलाव (ठेका) पध्दतीने सर्वत्र शासनाकडुन दिला
जात असुन राज्यात वाळु गोण्या विक्री डेपो सुरु करण्यात यावेत अशी मागणीचे निवेदन राज्याचे महसुल मंत्री ना.श्री.चंद्रकांत पाटील यांना भाजपा धुळे जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांचा मार्गदर्शनाखाली भाजपा
जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी यांनी दि.२३/७/२०१९ रोजी मंत्रालयात भेट घेवुन दिले. निवेदनाची प्रत मुख्यमंत्री ना.श्री देवेंद्र फडणवीस यांना हि देण्यात आली आहे. भाजपा जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी यांनी दिलेल्या निवेदनात नमुद करण्यात
आले आहे की राज्यात वाळु लिलाव (ठेका) पध्दतीने दिल्या गेल्यावर ठेकेदार लिलाव पेक्षा अधिक प्रमाणत वाळु उपसा करतात. तेव्हा मात्र अधिकारी, कर्मचारी ठेकेदारास मज्जाव करतात या दरम्यान ठेकेदार व अधिकारी, कर्मचारी यांचा मध्ये वादावादी झाल्याच्या घटना घडला आहेत. वादावादीचे रुपांतर हाणामारीत होवुन प्रसंगी जिवित हानी होते. राज्यात अश्या प्रकरण्यात अनेक अधिकारी, कर्मचारींना जीव गमवावा
लागला असुन अनेक जण जखमी झाले आहेत. तसेच वाळु वाहन चालक रस्तावरुन वाहन वेगवान चालवतात त्यामुळे परिसरातील सर्व सामान्य नागरीक भयभीत असतात. वाळु वाहन वेगवान असल्या
कारणाने राज्यात अनेक नागरीक मरण पावल्याच्या घटना झाल्या आहेत. तर अनेक जण जबर जखमी झाले आहेत. या गोष्टीला पायबंद घालण्यासाठी राज्यात वाळु गोण्या विक्री डेपो तालुका स्तरावर सुरु करुन २५/५० किलोच्या वाळु गोण्या शासनाने महसुल विभागातुन कर्मचारी नेमुन रितसर शासन दराने पावतीने विक्री करावी यामुळे शासनाला मोठ्या प्रमाणात महसुल मिळु शकेल.याकामी राज्यभर कर्मचारी भरतीपण होवु शकते.
तसेच जनतेला होणारा त्रास कमी होईल.देशात अनेक राज्यात वाळु गोण्या विक्री डेपो सुरु असुन आपण हि महाराष्ट राज्यात वाळु लिलाव (ठेका) पध्दत बंद करुन वाळु गोण्या विक्री डेपो सुरु
करण्यासाठी आपल्या स्तरावरुन निर्णय व्हावेत अशी मागणी करण्यात आली आहे.महसुल मंत्री ना.श्री.चंद्रकांत पाटील यांनी सांगितले कि हि संकल्पना चांगली असुन नक्कीच राज्यात वाळु गोण्या विक्री डेपोसाठी शासनस्तरावर विचार करण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बेटावद / शिरपूर (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (PSE) इ...
-
शेळगावातील तरुणांचा दारूबंदीचा निर्धार; ग्रामस्थांच्या वतीने माजी सैनिकासह दोघांचे आमरण उपोषण परंडा, दि. १२ : शेळगाव ग्रामसभेने ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा