Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, २४ ऑगस्ट, २०१९

चोरीच्या ७ मोटरसायकलसह दोन आरोपी ताब्यात... चोरीच्या चार लाख किंमतीच्या ७ मोटरसायकलसह २ आरोपींना शिंदखेडा पोलीसांनी ताब्यात घेत उल्लेखनीय कामगिरी केली आहे.





प्रतिनिधी शिंदखेडा शहरात मोटरसायकल चोरीचे प्रमाण वाढले होते.या चोरांचा शोध घेणे सुरु होता.अखेर या मोटरसायकल चोरणार्या दोन संशयितांंना शिंदखेडा पोलीसांनी ताब्यात घेत एकुण चार लाख किंमतीच्या ७ मोटारसायकल जप्त केले आहे.शिंदखेडा शहरातील संशयित अनिल जगन पिंपळे व अजय विजय हजारे यांना शिंदखेडा पोलिसांनी अटक केली आहे.
शिंदखेडा पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली या चोरीच्या 

मोटारसायकलींचा शोध लावण्यासाठी पथक नेमण्यात आले होते.त्या पथकात पोसई मैनुद्दीन हबीब सयद,मपोसई गितांजली सानप,पोहेकाँ मिलींद सोनवणे,रफिक मुल्ला,सायसिंग पावरा,पोना एकलाख पठान,पोकाँ बिपीन पाटील,मयुर थोरात,हर्षल चौधरी,मनोज दाभाडे,आबा भिल,ललितकुमार काळे,शुशिलकुमार गांगुर्डे,गोपाल माळी,मोहन सुर्यवंशी,विजय पाटील,कैलास महाजन आदी पथकाने ही कारवाई केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध