Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, १९ ऑगस्ट, २०१९
Home
/
Unlabelled
/
संवाद यात्रेचा दुसरा दिवस ठरला चर्चेचा, नगरपरीषदेच्या शाळेसह शहरातील नाल्याबाबत जनतेची समस्या
संवाद यात्रेचा दुसरा दिवस ठरला चर्चेचा, नगरपरीषदेच्या शाळेसह शहरातील नाल्याबाबत जनतेची समस्या
शिरपूर प्रतिनिधी :शहरातील संवाद यात्रेचा आजचा दुसरा दिवस चर्चेचा ठरला.संवाद यात्रेचा आजचा दुसरा दिवस शहरातील मराठा गल्ली,ईदगा नगर,मोहमद्दीया चौक,क्रुषी मोहल्ला, बडागांव मजीद, दादा गणपती गल्ली भागात पोहचला यावेळी शहाराची खरी परिस्थिती पहावयास मिळाली.जनतेने आपल्या समस्या मांडतांना शहरातील खरी परिस्थितीचे वास्तव यावेळी समोर मांडले.
शहरातील मराठा गल्ली,ईदगा नगर,मोहमद्दीया चौक,क्रुषी मोहल्ला, बडागांव मजीद या भागातील प्रत्येक गल्लीत डॉ जितेंद्र ठाकूरांनी संवाद यात्रे दरम्यान जाऊन तेथील नागरिकांचे समस्या व प्रश्न जाणून घेतल्या यावेळी तालुक्याध्यक्ष राहुल रंधे, नगरसेवक हेमंत पाटील, नगरसेवक रोहित रंधे,हेमराज राजपूत,नितीन राजपूत,मनोज महाजन, विकी चौधरी,जाकरेली जे के,मोबीन शेख,अरमान मिस्तरी,जाकीर तेली, आदीसह भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी महिलांनी व नागरिकांनी समस्यांचा पाढा वाचला शहरातील ईदगा नगर मध्ये शहरातील मोठा नाला जातो जेथे शहरातील संपूर्ण दुषीत पाणी व घाणीचे पाणी या नाल्यातून जाते.हा नाला अद्याप मोकळा आहे.या नाला बांधकामासाठी अल्पसंख्याक मधून २१ लाख निधी नगरपालिकेला प्राप्त झाला आहे याबाबत.येथील नागरिक वारंवार नगरपालीकेला सांगून देखील नगरपालिका दुर्लक्ष करते,मात्र अद्याप यावर काही एक कारवाई न केल्याने येथील जनतेला उघड्यानाल्या जवळ राहवे लागत आहे. नाल्याच्या दुर्गंधी, व दुषीत पाणीमुळे येथील नागरीकांच्या आरोग्यास धोका निर्माण होत आहे.
यानंतर शहरातील नगरपरीषदेच्या क्रमांक ४ व ५ मधील शाळेतील विद्यार्थ्यांकडून फि वसूली केली जाते व यावर कच्ची पावती दिली जाते.वास्तविक नगरपरीषदेकडून कुठलाही पैसा जनतेकडून घेतला जात नाही याबाबत सर्व शिक्षा अभियानामार्फत नगरपरीषदेला निधी पुरवला जातो मात्र तरी देखील येथील नगरपरीषदेच्या शाळेकडून फिच्या नावाने पैसे वसूल केले जात असल्याचे यावेळी नागरिकांनी सांगितले.या भागातील रस्त्यावरील चेंबर उघड्या असल्याने या ठिकाणी धोकादायक घटना घडत असतात.काही भागात शौचालयासाठी मिळणारा निधी दिला जात नाही.दिला तर काही निधी पुर्ण मिळत नाही. दादा गणपती भागात शौचालयासाठी अद्याप निधी मिळालेला नाही,शोषखड्डे खोदायला सांगून निधी दिला जात नाही,रेशन मिळत नाही असे असंख्य प्रश्नांचा पाढा यावेळी डॉ जितेंद्र ठाकूर यांच्यासमोर मांडण्यात आला.मुळात शहरातील जनता समस्यांंच्या विळख्यात आहे हे यातून समोर आले आहे.
*डॉ जितेंद्र ठाकूर*
*भाजपा तालुका प्रभारी*
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा