Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, १६ ऑगस्ट, २०१९

वैजापूर घटनेतील आरोपीला फाशीची शिक्षा द्या ,या मागणीसाठी तहसील कार्यालयात चार ते पाच हजार लोकांच्या प्रचंड जनआक्रोश मोर्चा,,,,,






चोपडा (प्रतिनिधी) विनोद निकम
तालुक्यातील वैजापूर येथील दोन अल्पवयीन आदिवासी मुलीवरदि,13 रोजी देवेंद्र मोरे या नराधमाने ज्या दोन आदिवासी मुलींवर लेंगिक अत्याचार केला त्याला लवकरात लवकर फाशी देण्यात यावी अशी मागणी आज सुमारे चार ते पाच हजार महिला पुरुषांनी विश्रामगृह पासून ते तहसील कार्यालया प्रयत्न येवून प्रचंड मोर्चा काढला,आदिवासी लहान चिनुकल्याच्या  वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले,

मोर्चेकरांनीखालील प्रमाणे मागण्या निवेदनाद्वारे तहसीलदारांना देण्यात आल्या आहेत,

सदर खटला जलद गती न्यायालयात चालवण्यात यावा,आरोपाला फाशी ची शिक्षा देण्यात यावी, जिवेमारण्याचा प्रयत्न तसेच अपहरणाचा प्रयत्न व तत्सम इतर कलमांचा समावेश करण्यात यावा,सदर गुन्हा उच्चअधिकारी यांच्या कडे 

चोकशीसाठी सुपूर्द करावा,या प्रकरणात विशेष सरकारी वकील ऍड उज्वल निकम साहेब यांची नेमणूक करण्यात यावी,दोन्ही पीडितांना मनोधैर्य योजने अंतर्गत लाभ मिळावा,दोन्ही मुलींची शिक्षणाची 
जवाबदारी शासनाने घ्यावी, अश्या मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देऊन मोर्चा शांततेत पार पडला, यावेळी परिसरातील 47 सामाजिक संघटनांनी आजच्या जण आक्रोश मोर्चाला पाठिंबा दिला, यावेळी तालुक्यातील सर्व पक्षीय नेते व प्रचंड प्रमाणात जनसमुदाय उपस्थित होते,

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध