Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, १६ ऑगस्ट, २०१९
चोपडा भगिनी मंडळ व राष्ट्रवादी काँग्रेस कडून पूरग्रस्तांना मदतीचा हात
चोपडा (प्रतिनिधी)विनोद निकम
कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील भयावह पूरपरिस्थिती लक्ष्यात घेवुन चोपडा राष्ट्रवादी काँग्रेस व भगिनी मंडळ शिक्षण संस्था यांच्या संयुक्त उपक्रमाने पूरपरिस्थितील अटकलेल्या नागरिकांना मदतीसाठी नर्सिंग कॉलेज च्या विद्यार्थ्यांना मोफत आरोग्य सेवा देण्यासाठी व आय टी आय च्या
इलेक्ट्रॉनिक मध्ये शिक्षण घेत असलेल्या विध्यार्थी यांना वीज पुरवठा सुरळीत चालू करण्यासाठी व तेथील महिला यांना साळी चोळी आणि लहान मुलांना ड्रेस घेऊन त्या ठिकाणी विद्यार्थी सह राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी यांना रवाना केले आहे ,यावेळी सर्व साहित्य भरलेल्या वाहनांना महाराष्ट्र विधानसभेचे माजी अध्यक्ष अरूणभाई गुजराथी आणि तहसीलदार अनिल गावित यांचा हस्ते हिरवा झेंडा दाखवून रवाना केले आहे,
यावेळी,
विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराथी, माजी आमदार जगदीश वळवी,नगराध्यक्षा मनीषा चौधरी,चोसाका माजी चेअरमन घनश्याम पाटील,पीपल बँकेचे चेअरमन चंद्रहास गुजराथी तहसीलदार अनिल गावित, पो.निरीक्षक विनायक
लोकरे,चोसाका चेअरमन अतुल ठाकरे, डॉक्टर सेलचे विजयसिंह पाटील, उद्योजक आशिष गुजराथी तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, नगरसेवक जीवन चौधरी, रमेश शिंदे,नगरसेविका सरला शिरसाठ,अश्विनी गुजराथी ,पूनम गुजराथी,कांचन राणे,छाया गुजराथी, गोकुळ पाटील,ऍड डी पी पाटील,समाजकार्य महाविद्यालयाचे प्रा. आशिष गुजराथी ,प्रा. ईश्वर सौंदनकार ,भगिनी मंडळ व समाजकार्य महाविद्यालयाचे प्राध्यापक व कर्मचारी वृंद उपस्थित होते,
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
माधव खाबिया वणी : वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या मटका व्यवसायावर पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक...
-
वणी : महेंद्र लोढा पर्वाधिराज पर्युषण महापर्वाचा कसबे वणी येथील शंखेश्वर पार्श्वभ्युदय तीर्थक्षेत्री अत्यंत भक्तीमय आणि मंगलमय वातावरणात सम...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा