Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, ३ ऑगस्ट, २०१९

निंभोरा येथे मराठा समाजाच्या सभागृहासाठी १५ लाख निधी मंजूर. नामदार हरिभाऊ जावळे यांच्या पाठपुराव्याला यश .


प्रतिनिधी(अजीज शेख)  निभोरा 
येथील मराठा समाज शिंगा साधू मठ सभागृहासाठी नामदार हरिभाऊ जावळे यांच्या माध्यमातून १५ लाख रुपये इतका निधी ,मंजूर करण्यात आलेला आहे.

निंभोरा येथील शिंगा साधू मठ मराठा समाजाच्या आस्थेचा विषय आहे.या मठात सर्व जाती,धर्माचे लग्न कार्य,कर्ण छेदन कार्यक्रम, आणि  इतरही सामाजिक कार्य, उपक्रम सातत्याने होत असतात.पण पुरेशा सोई सुविधे अभावी अनेक अडचणी ग्रामस्थांना येत होत्या.अनेक दिवसांपासून या भागातील मराठा समाज आणि इतर ग्रामस्थांची या सभागृहांसाठीची मागणी होती.

या निमित्ताने ती मागणी रावेर तालुक्याचे आमदार तथा ना. हरिभाऊ जावळे यांनी सातत्याने पाठपुरावा करून पूर्ण केली आहे.या माध्यमातून सभागृहाचे काम 

चांगल्या पद्धतीने होऊन सोई सुविधा युक्त सभागृह निर्माण होऊन नागरिकांना या सभागृहाचा फायदा होणार आहे.सबंधित मठांला निधी मिळाल्याने मराठा समाजात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध