Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, ४ ऑगस्ट, २०१९
Home
/
Unlabelled
/
बेगाने शादी मे अब्दुल्ला दिवानाअनेकांना लागले विधानसभेचे डोहाळे डोहाळ जेवणालाही सुरवात
बेगाने शादी मे अब्दुल्ला दिवानाअनेकांना लागले विधानसभेचे डोहाळे डोहाळ जेवणालाही सुरवात
महाराष्ट्रात सध्या विधानसभा निवडणुकीचे अनाधिकृत रित्या का असोना बिगुल वाजलेत . ५ वर्षात कधीच कुठल्या महापुरुषाच्या व इतर धर्मियांचे सण लक्षात न ठेवणारे आता प्रत्येक दिवशी एक नवीन पोष्ट करतांना दिसत आहे . त्यात नवीन काय फुकटचा मीडिया (सोशल मीडिया ) असल्याने कुणाच्या पुण्यतिथीच्या तर कुणाच्या जयंतीची पोष्ट टाकायला पैसे थोडी लागते व्हय !. असो पण सर्व गोंगाटात वरोरा धुळे व नंदुरबार विधानसभा क्षेत्रातिल राजकारणाने काही वेगळेच वळण घेतलय . साहेब शेवटची निवडणूक होऊन जाऊ द्या . असे म्हणत आता एका जेष्ठ नेत्याचे चाहते आता साहेबांनीच निवडणूक लढवावी अशी चर्चा करतांना दिसत आहे . पावसाळी बेडूक हे वाक्य आता जुने झाले आहे , वाचकांना हीकंटाळा आला असेल नाही का ? बेगाने शादी मे अब्दुल्ला दिवाना असे म्हटले तर वाचकांना ही काहीतरी नवीन वाचल्या सारखे होईल म्हणून . वर्षभर ना जातीसाठी, ना समाजासाठी, ना वार्डा साठी , ना गावासाठी काही केलेले . आता विधानसभा निवडणुकीसाठी नववरा सारखे गुडघ्याला बाशिंग बांधून निवडणुकीच्या मैदानात शुभमंगल सावधान करण्यासाठी सज्ज झाले आहेत., एखाद्या गरोदर महिलेला माती खाण्याचे, आंबट खाण्याचे डोहाळे लागावे तसे या पावसाळी बेडूकांना विधानसभेचे डोहाळे लागले त्यात नवल काय ?
पुढील अंकात वाचा सविस्तर
हमे सस्पेन्स रखनेमे मजा आता है ! या मंगळवारच्या अंकात सविस्तर वाचायला विसरू नका :मी वरोरा धुळे व नंदुरबार विधानसभा क्षेत्र बोलतोय
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
माधव खाबिया वणी : वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या मटका व्यवसायावर पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक...
-
वणी : महेंद्र लोढा पर्वाधिराज पर्युषण महापर्वाचा कसबे वणी येथील शंखेश्वर पार्श्वभ्युदय तीर्थक्षेत्री अत्यंत भक्तीमय आणि मंगलमय वातावरणात सम...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा