Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, १७ ऑगस्ट, २०१९

श्रावणमासात चोपडा येथील द्वारकाधिश मंदिरात झुलाचे अनोखे देखावे* *१२५ वर्षांची परंपरा ; वैष्णव भाविकांची गर्दी*






चोपडा:प्रतिनिधी( विनोद निकम )  येथील गुजराथी गल्लीतील स्थित १२५ वर्ष जुने द्वारकाधिश मंदिरात (हवेली) श्रावण मासानिमित्त महिनाभर झुला महोत्सव साजरा केला जातो या झुला ( हिंनंदौरा) महोत्सवात रोज नवनवीन देखावे सजवले जातात या देखावे पाहण्यासाठी वैष्णवपंथी भाविकांची मोठी गर्दी असते 

सविस्तर असे की, येथील जवळपास १२५ वर्ष जुने द्वारकाधिश मंदिर (हवेली) असून येथे वर्षभरात अनेक कार्यक्रम होत असतात ठाकुरजीची मूर्ती ( श्रीकृष्णाचे अवतार ) असून दर वर्षी श्रीकृष्ण महोत्सव मोठ्या प्रमाणात होत असतात तसेच श्रावण मासात संपुर्ण महिनाभर झुला महोत्सव असतो यात वैष्णवपंथीच्या महिला रोज नवनविन सजावट करत असतात ही 

सजावटीचे वैशिष्ट्य म्हणजे ही सजावट करत असताना कुठेही चिपकवण्यासाठी कोणतेही साधन वापरले नसते ही सजावट फक्त एक बारीक दोराने बांधण्याचे काम करून केली जाते ही कला कृतीचे काम ठराविक महिलाच अवघ्या दोन ते तीन तासातच करून घेतात हा झुला महोत्सवात कधी केळीचे पिन काडून तर केळीचे कच्ची कळ्या कधी फळफ्रूट, ड्रायफ्रूट , 

भाजीपाला, आणि शेवटच्या दिवशी काचेच्या तुकड्या पासून ही सजावट केली जाते ही सजावट इतकी अप्रतिम असते की, एखाद्या कलाकारांने काम केले असावे असे त्या सजावटीत काम दिसत असते नक्षीदार, कोरीव, कलरिंग, आणि मांडणी अश्या विविध अंगांनी हा देखावा सजविला जात असतो ही सजावट दुपार पासून 

करण्यासाठी सुरुवात केली तरी संध्याकाळ पर्यंत पूर्ण होऊन संध्या.दर्शनासाठी खुले करत असतात या वेळी वैष्णव पंथी सह परिसरातील अनेक जाती धर्माचे भाविक येत असतात ही कलाकृती पाहून मन प्रसन्न होत असते आणि कशी केली असेल ? हा विचार करत मंदिरात भाविक बसूनच राहत असतात ही सजावट करण्यासाठी  सौ आश्वनी गुजराथी, सौ सोनल गुजराथी, सौ तेजु गुजराथी, सौ सेजल गुजराथी, सौ शैला गुजराथी, सौ अर्चना गुजराथी यांच्या सह अनेक महिला महेनत घेत असतात .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध