Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, ११ ऑगस्ट, २०१९

भारतीय जन सम्राट पार्टी ची अनु.जाती मोर्चा नांदुरा शहर कार्यकारणी घोषीत






नांदुरा प्रतिनिधी  (का.प्र) भारतीय जन सम्राट पार्टी अनुसुचीत जाती मोर्चा नांदुरा शहराची बैठक आज दि 11 ऑगष्ट रोजी राष्ट्रीय अध्यक्ष भाऊसाहेब बावने तसेच राष्ट्रीय कोषाध्यक्ष कलीमखान पठान यांच्या उपस्थितीत शासकीय विश्राम गृह येथे संपन्न झाली या सभेत  शहर अध्यक्ष दगडु हरीभाऊ तांदळे यांनी आपली शहर 

कार्यकारणी घोषीत केली या मध्ये अशोक निनाजी वाकोडे ,पुंडलीक तुकाराम चिमकर यांची उपाध्यक्ष पदी तर सचिव संजय वामन बावस्कार,सह सचिव  बळीराम त्र्यंबक सावरकर कोषाध्यक्ष गणेश एकनाथ उंबरकर  तर सदस्य पदी कमलाकर 

प्रभाकर धुरंधर,कैलाश चिमकर तसेच इतर सदस्यांची घोषणा केली आहे या वेळी सर्व पदाधिकारी यांना पक्षाचे सभासदत्व देवुन भाऊसाहेब बावने यांनी त्यांचा सत्कार केला या वेळी शहर अध्यक्ष दगडु तांदळे यांनी सर्व पदाधिकारी यांचे आभार व्यक्त केले या कार्यक्रमाला अल्पसंख्याक सेल चे पदाधिकारी सलीम खान,शब्बीर खान हे हजर होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध