Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, ११ ऑगस्ट, २०१९

भारतीय जन सम्राट पार्टी महिला मोर्चा चे चिखलात बसुन अनोखे आंदोलन



 रस्त्याचा प्रश्न मार्गी न लागल्यास संबंधित अधिकार्‍यांच्या तोंडाला काळे फासुंन   बांगड्याचा अहेर देऊ जिल्हाध्यक्ष सौ उषातााई  मानकर  




प्रतिनिधी मलकापुर जिल्हा बुलडाणा  मलकापुर शहरा पासुन 10 ते 12 किलोमीटर अंतरावर असलेल्या चिंचोली -वाघोळा रस्त्याची दयनीय अवस्था झाली असुन 15 दिवसात या गावात जाणारा रस्त्याचा प्रश्न मार्गी न लागल्यास संबंधित अधिकार्‍यांच्या तोंडाला काळे फासु असे आवाहन वाघोळा येथील भारतीय जन सम्राट पार्टी च्या महिला मेळाव्या प्रसंगी जिल्हाध्यक्ष - सौ उषातााई  मानकर यांनी केले पुढे त्या म्हणाल्या की या गावातील रस्ता पाहता सर्वत्र चिखल आहे   अधिकारी व पदाधिकारी यांना लाज वाटायला पाहीजे की विद्यार्थ्यांनी शाळेत जायचे कसे?  

महिला प्रसूती साठी अतोनात त्रास होत आहे याकडे जिल्हा परिषद अध्यक्षा व ऊपाध्यक्षा  यांचे समस्येकडे लक्ष नाही  याबाबत सविस्तर असे की  चिंचोल व वाघोळा येथे पक्षाच्या वतीने दि 11 ऑगष्ट रोजी  महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते येथील महिलांनी आपली आपबीती व्यक्त करीत आपल्या विविध समस्या मांडल्या भारत स्वतंत्र झाल्यानंतरही अजुनही या गावात जाण्या करीता रस्ता नाही तसेच एकही मुलभूत सुविधा नाही  सरपंच व उपसरपंच आपला मलिदा लाटून साखरझोप घेत आहेत असा आरोप या वेळी त्यांनी केला यावेळी जिल्हा सचिव आशाताई  पारसकर आपल्या 

भाषणात म्हणाल्या की  15 दिवसाच्या आत चिंचोल गावाचा रस्त्याचा प्रश्न सुटला नाही तर संबंधित अधिकारी व पदाधिकारी  यांना    बांगड्याचा अहेर देऊ यावेळी वाघोळी गावात संपन्न झालेल्या मेळाव्यात शहराध्यक्ष सौ. रेखा शर्मा व नंदा वानखेडे यांच्या सह  खेड्यातील असंख्य महिला उपस्थित होत्या कार्यक्रमाचे संचालन नंदा वानखेडे यांनी तर आभार प्रदर्शन सौ.रेखा शर्मा यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध