Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, १८ ऑगस्ट, २०१९

भूमाता ब्रिगेडतर्फे मुकबधीर विद्यालयात स्वातंत्र्यदिन साजरा






 शिरपूर :(प्रतिनिधी) - भूमाता ब्रिगेड शिरपूर तर्फे संस्थापक अध्यक्ष सौ.तृप्ती देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर येथील प्रियदर्शिनी मुकबधीर विद्यालयात स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. भूमाता ब्रिगेड शिरपूरचे अध्यक्ष राजेश मारवाडी यांच्या हस्ते ध्वजारोहन कार्यक्रम करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना ब्रिगेडतर्फे मिठाई व शालेय साहित्य वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर कार्यक्रम सादर केला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भूमाता ब्रिगेडचे डॉ.सुरेश जैन होते. प्रमुख अतिथी म्हणून भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक सचिव सौ.मनिषा टिळेकर व सौ.कल्पना राजपूत, लायनेस क्लबच्या सौ.कविता बाविस्कर , सौ.शारदा पंडीत, सौ.संध्या जैन, सौ.पाटील उपस्थित होते. चित्रकला स्पर्धेत यशस्वी स्पर्धकांना लायनेस क्लबतर्फे बक्षिसे प्रदान करण्यात आले.

मुख्याध्यापक एस.एल.देशमुख यांनी प्रास्ताविक केले. एस.जे.बहिरम यांनी स्वागत केले. तर ए.जी.भावे यांनी स्वातंत्र्य चळवळीची माहिती विद्यार्थ्यांना दिली. आर.डी.शिंपी यानी सुत्रसंचालन व जी.बी.मराठे यांनी आभार प्रदर्शन केले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध