Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, २५ ऑगस्ट, २०१९
शकुंतलाबाई यांचे समाधी मरण
चोपडा- (प्रतिनिधी ) विनोद निकम येथील प्रकाश प्रोव्हिजन्स चे संचालक वालचंद जैन यांची धर्मपत्नी स्व. सौ. शकुंतलाबाई वालचंद जैन यांचे दि 23/08/2019 रोजी संध्याकाळी 8:10 वाजता समाधी मरण झाले प.पू. संतशिरोमणी आचार्यश्री 108 विद्यासागरजी मुनीमहाराजांचे प्रेरणेने तसेच पारोळा येथे विराजमान प.पू. मुनींश्री 108 अक्षयसागरजी महाराज, प. पू. मुनींश्री
108 नेमीसागरजी महाराज, शुल्लकरत्न 105 समताभूषणजी महाराज यांच्या सानिध्यात दि 15/08/2019 ला प्रथम मिथ्यात्वचे त्याग करून नंतर 2 प्रतिमा, घराचे त्याग, 3 प्रकारचे आहाराचे त्याग तसेच महाराजींचे दर्शन घेतल्यावर स्वतःच्या स्व इच्छेने त्यांनी श्रीफळ चढवून आजीवन व्रत घेतले. 3 जल उपवास झाल्यानंतर त्यांनी दि 18/08/2019 रोजी परत विनंती केली व चार ही प्रकारचे आहार त्याग करून यम सल्लेखने ला सुरुवात केली.
पारोळा येथील समाजाने खूप सहायता करून ह्या सल्लेखनेत आपले अनमोल सहकार्य दिले तसेच दि 23/08/2019 रोजी दिगवंदना करून त्यांची यम सल्लेखना ही सफल झाली, त्यामध्ये बारामती चे प्रतिमाधारी सविता दिदी शहा व चोपड्याहुन आलेल्या श्रावकांनी 24 तास णमोकार जाप केले व आपले देखील समाधी मरण होवो अशी भावना केली.
दि 24/08/2019 रोजी सकाळी 08:15 वाजता श्री विद्यासागर संत निवास मधून अंतिम यात्रा निघाली, जुन्या वैकुंठधाम समोरील शेतात त्यांचे अंतिम संस्कार करण्यात आले. येथे सर्व समाजाने सिद्ध भक्ती, श्रुत भक्ती व शांती पाठ केले. समाजच्या वतीने राहुल रसिकलाल जैन यांनी श्रद्धांजली वाहून आपले जीवनात परिवर्तन कसे करावे व समाधीकरित असतांना नुसते देहाची नाही तर कर्माची निर्जरा करून समाधी साधायची असते.
गुरूंचे तसेच पारोळा जैन समाजाचे व समाधी मध्ये ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्यांचे अनंत उपकार आमच्यावर झाले अशी भावना व्यक्त केली.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
प्रतिनिधी : गणेश चव्हण अमळनेर अमळनेर तालुक्यातील शहापूर येथे मंगळवारी (दि. २३ जून) दुपारी विजेच्या तडाख्याने एका युवा शेतकऱ्याचा दुर्दैवी ...
-
▶ वणी प्रतिनिधी लखमापूर येथील दालमिया पॉलीप्रो कंपनीकडून मोठ्या प्रमाणावर जल आणि वायू प्रदूषण होत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आह...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा