Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, २५ ऑगस्ट, २०१९
Home
/
Unlabelled
/
माजी केंद्रीय अर्थमंत्री स्व. अरुणजी जेटली भाजपाचे व भारताचे थोर नेते होते : बबनराव चौधरी
माजी केंद्रीय अर्थमंत्री स्व. अरुणजी जेटली भाजपाचे व भारताचे थोर नेते होते : बबनराव चौधरी
शिरपुर (प्रतिनिधी) भारताचे माजी अर्थमंत्री स्व. अरुणजी जेटली भाजपाचे व भारताचे थोर नेते होते.
ते एक उमदा विद्यार्थी नेता, आणिबाणी विरूद्ध कठोर संघर्ष करणारा नेता, मानवी हक्कांचा खंदा समर्थक, एक उत्तम आणि निष्णात विधिज्ञ आणि संघर्षशील नेतृत्त्व आपल्यातून कायमचे निघुन गेले असे भाजपा धुळे जिल्हाध्यक्ष तथा नासिक म्हाडा उपसभापती बबनराव चौधरी यांनी सांगीतले. येथील भाजपा कार्यालयात माजी केंदीय अर्थमंत्री स्व. अरुणजी जेटली यांची प्रतिमा पुजन करुन त्यांना भावपुर्ण श्रध्दांजली वाहण्यात आली. ते पुढे म्हाणाले कि देशाचे अर्थमंत्री, संरक्षणमंत्री, माहिती आणि प्रसारणमंत्री, विधी व न्याय विभागाचे मंत्री, विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी दे शाची केलेली सेवा कायम स्मरणात राहील.
असेही जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांनी सांगितले. याप्रसंगी भाजपा जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी, जिल्हा उपाध्यक्ष किशोर माळी, जिल्हा चिटणीस संजय आसापुरे, चंद्रकांत पाटील, जिल्हा कोषाध्यक्ष आबा धाकड, तालुका प्रभारी डाॅ. जितेंद्र ठाकुर, अनु जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष प्रताप सरदार, भाजपा शहराध्यक्ष हेमंत पाटील, शहर उपाध्यक्ष मुकेश पाटील, प्रशांत चौधरी, शहर चिटणीस अविनाश शिंपी, राधेश्याम भोई, अल्पसंख्याक मोर्चा जिल्हा सरचिटणीस मुबीन शेख, शहराध्यक्ष अरमान मिस्तरी, युवा मोर्चा शहराध्यक्ष विक्की चौधरी, शेतकरी आघाडी जिल्हा उपाध्यक्ष भास्कर बोरसे, भटक्या विमुक्त आघाडी जिल्हा उपाध्यक्ष बापु लोहार, शहराध्यक्ष रविंद्र भोई, व्यापारी आघाडी शहराध्यक्ष नंदु माळी, ओबीसी मोर्चा शहराध्यक्ष रविंद्र सोनार, ईश्वर चौधरी, छोटु पाटील आदि उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नाशिक ब्युरो चीफ कसबे वणी, ता. दिंडोरी परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा आरोपी अटकेत वणी पोलीस ठाणेस गुरनं ४३/२०२६ भा.न्या.सं. कलम ६४...
-
"जिल्हा अधिकाऱ्यांची संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई कधी? वरिष्ठ प्रशासनाच्या भूमिकेकडे जनतेचे लक्ष!" शिरपूर प्रतिनिधी:- शिरपूर येथील ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा